Breaking News

कळस कितीही भव्य दिव्य दिसत आसला तरी खालचा पाया खुप महत्वाचा - आमदार निलेश लंके

कळस कितीही भव्य दिव्य दिसत आसला तरी खालचा पाया खुप महत्वाचा  - आमदार निलेश लंके


पारनेर प्रतिनिधी-
 मी आमदार झालो किंवा आणखी काही झालो कुठेही गेलो तरी हंगा ग्रांमस्थाचे माझ्यावर मोठे ऋण आहे .ते मी कधीही विसरणार नाही " कळस कितीही भव्य दिव्य दिसत आसला तरी खालचा पाया खुप म्हत्वाचा आहे ".हंगा ग्रांमस्थामुळेच मी ग्रांमपचायत सदस्य .सरपंच .पंचायत समिती सदस्य उपसभापती जिल्हा परिषद सदस्य .जिल्हा नियोजन मंडळ व विधानसभा ही शिखरे यशस्वी पार करू शकलो. त्यामुळे हंगा ग्रामस्थ माझ्या यशाचे शिल्पकार आहेत .असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी हंगा गावात आयोजित केलेल्या एक वर्षे पुर्ती कार्यक्रमात गावकर्याशी संवाद साधताना बोलत होते ,
     २४ आँक्टोबर २०१९ रोजी राज्यभर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे निकाल लागले पारनेर तालुक्यात इतिहास घडला व सामान्य कुटुंबातील मा .निलेश लंके पारनेर नगरचे आमदार म्हणून भरघोस मतानी निवडून आले होते या घटनेला  एक  वर्षे पुर्ण झाले म्हणून हंगा ग्रांमस्थानी आमदार लंके याचा सत्कार व "संवाद ग्रांमस्थाशी" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .यावेळी व्यासपिठावर लंके यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके वडील ज्ञानदेव लंके गुरुजी आई भाऊ दिपक लंके व वहीनी गावातील सरपंच उपसरंपच सदस्य सेवा सोसायटी चे चेरमण व्हायचेरमन व सदस्य उपस्थित होते ,
  यावेळी गावकर्याशी संवाद साधताना ग्रांमस्थानीही आमदार लंके याना बिनधास प्रश्न विचारले समस्या सांगितल्या तर आमदार लंके यांनीही आजपर्यंतच्या राजकीय व काही पडद्यामागील गोष्टींचा दिलखुलास उलगडा केला .जीवनातील चढ- उतार सांगितले .तुम्हा हंगा गावकर्यामुळे ग्रांमपंचायत सदस्य ते आमदार निलेश लंके हा प्रवास घडला अशे त्यांनी मनमोकळे पणाने सांगितले ." तुम्हाला आमदार झाल्यासारखे वाटते का ?  या चंद्रकांत मोढवे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना लंके म्हणाले मला आमदार झाल्यासारखे नाही वाटत परंतु येथे बसलेल्या व आपल्या मतदार संघातील प्रत्येकाला आमदार झाल्यासारखे वाटते असे आमदार लंके यांनी हसत सांगितले.
   भविष्यात तालुक्यात भरीव काम करणार असुन हंगा हे एक माँडेल व्हिलेज बनवणार आहे .यावेळी लंके यांनी के.के.रेज .कोरोना काळातील काम .कोव्हीड सेंटर .पवार घराण्याची जवळीक ही कामाची पावती आहे अशेही लंके आवर्जून म्हणाले .कार्यक्रमात महीला पुरुष यांनी आमदार लंके याना प्रश्न विचारले यावेळी संपुर्ण लंके परिवाराचा सत्कार ग्रांमस्थाच्या वतिने करण्यात आला.  त्याअगोदर आमदार लंके याची गावातुन बैलगाडीतुन मिरवणूक  काढण्यात आली.  कार्यक्रमाच्या आध्यक्षस्थानी धोंडीभाऊ नगरे हे होते .कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेंद्र शिंदे यांनी केले तर उपस्थितचे स्वागत चंद्रकांत मोढवेसर यांनी केले .सुञसंचालन भाऊ नगरे यांनी केले तर आभार नंदु सोंडकर संतोष ढवळे यांनी मानले .कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .