Breaking News

रुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.

रुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.
--------------
पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध.
------------- 
 धबधबा ठरत आहे मृत्यूचा सापळा महिनाभरापूर्वी रेल्वे पोलीसाचा बुडून झाला मृत्यू ही दुसरी घटना.


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील रुई चोंडा धबधबा येथे दि. २५ रोजी १ च्या सुमारास १८ वर्षीय तरुण आंघोळ करत असताना धबधब्याजवळ खड्ड्यांमध्ये पडून बुडाला आहे. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही पारनेर पोलीस स्थानिकांच्या मदतीने शोध घेण्याचे काम करत आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रेयश नवनीत जामदार वय १८ वर्षे राहणार शिरूर घोडनदी तालुका शिरूर जिल्हा पुणे व त्याचे पाच मित्र यांनी सोशल मीडियावर रुई चोंडा धबधबा त्याचे फोटो पाहून ते लोकांना विचारत आज २५ रोजी १:३० वा. रुई चोंडा धबधबा येथे फोटो काढण्यासाठी आले होते.या ठिकाणी ते अंघोळ करत असताना त्यांच्यापैकी श्रेयश जामदार वय १८ वर्ष हा धबधब्या जवळ असलेल्या खड्ड्यामध्ये पडल्याने बुडाला 

धबधब्याच्या खाली असणारा तो खड्डा जवळपास ५० ते ६० फूट खोल आहे व त्या खड्ड्याच्या आत मध्ये रांजणखळगे प्रमाणे आकार आहे. त्यानंतर त्याच्या मित्रांनी  ही माहिती स्थानिकांनी दिली त्यांनी पारनेर पोलीस स्टेशनला कळवले त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेश गवळी पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तरी त्वरित शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. तरुण अद्याप पर्यंत वरती आलेला नाही स्थानिक लोकांच्या मदतीने या ठिकाणी त्याचा शोध घेतला अद्याप तो मिळून न आल्याने धबधब्याच्या प्रवाहाला एका ठिकाणी वाघुर लावण्यात आलेले आहे. तरुणाच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आलेली असून तेही घटनास्थळी आले आहेत

  पोलीस निरीक्षक राजेश गवळी हेदेखील पथकासह घटनास्थळी शोध घेत आहेत तहसीलदार ज्योती देवरे यांना देखील याबाबतची माहिती कळवली असल्याचे गवळी यांनी सांगितले आहे. पोलिसांचे शोध कार्य सुरू आहे.
दरम्यान महिनाभरापूर्वी रूईचोंडा धबधबा येथे नगर येथील रेल्वे पोलिस बुडाला होता त्यानंतर त्याचा मृतदेह काही दिवसांनी तेथून चार ते पाच किलोमीटर अंतरावर सापडला त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे मात्र यामध्ये हा तरुण खड्ड्यांमध्ये बुडाल्यानंतर वर आला नाही असे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे त्यामुळे कदाचित हा तरुण खोल असणाऱ्या ५०ते ६० फूट खड्ड्यांमध्ये अडकला असण्याची शक्यता आहे या खड्ड्यांमध्ये रांजणखळगे सारखा आकार आहे.