Breaking News

निघोज येथील महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल.

निघोज येथील महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल.


पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील निघोज येथील महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सन २०१७ ते दि.१४ सप्टेंबर रोजी पर्यत मयत सोनल विकास दोंदे वय २५ रा. निघोज तालुका पारनेर ही तिचे पती विकास साहेबराव दोंदे वय ३० राहणार निघोज तालुका पारनेर यांचे सोबत सासरी नांदत असताना सन २०१७ ते १४ सप्टेंबर २० पर्यंत माळवाडी पुणे व निघोज येथे असताना तिचा पती हा तिला  दारू पिऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले याबाबतची फिर्याद जयवंत अमृत साठे वय ३१ धंदा खाजगी नोकरी राहणार वासुंदे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांनी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिली यावरून मयत महिलेच्या पती विरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दि.१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी पद्मने करत आहेत.