Breaking News

पठारवाडी येथील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी फिर्यादी व्हावे.

पठारवाडी येथील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी फिर्यादी व्हावे.
-----------------
फिर्यादी फितुर आरोपी मोकाट ; पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यावा लोकजागृती संस्थेची मागणी


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील आत्महत्या केलेल्या किरण उर्फ अक्षय लहू पवार वय २१ वर्ष रा. पठारवाडी ता. पारनेर जि. अहमदनगर याने जीवे मारण्याची धमकी व दमदाटी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी दाखल केली आहे. त्यावरून सचिन किसन वराळ विरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील आदिवासी तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.मृत तरुणाच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, कि माझ्या  मुलाला प्रेम प्रकरणातुन निघोज येथील सचिन मच्छिंद्र वराळ व इतर सात आठ लोकांनी मारहान केली होती. त्यामुळे त्याने आत्महत्या केली .व फिर्यादीनेही सुरवातीला आरोपींना जामीन मिळू नये अशी घेतली होती मात्र ती भूमिका अचानक बदलली , त्यामुळे या गुन्हयातील आरोपी रोहीणी वराळ व सचिन वराळ यांना जामीन मिळाला होता. फिर्यादि लहु शिवराम पवार यांनी  आरोपींच्या जामीनाच्या सुनावनी वेळी सरकारी वकीलांना अंधारात ठेवून खाजगी वकीलांना पुढे करून आरोपींना जामीन मंजुर करण्यास हरकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. पुढे त्यात म्हटले की माझा मुलगा संकेत सुपेकर यांच्या कडे पोल्ट्रीवर फार्मवर माझा मुलगा आकाश कामाला होता. संकेत याचे रोहीनी वराळ हिच्याशी प्रेमसंबंध होते व त्यानेच  माझ्या मुलाला मारहाण केल्यामुळे आत्महत्या केली आहे.फिर्यादीच्या अशा जबाबातील विसंगतीमुळे  आरोपींना जामीन मंजुर झाला.आत्महत्या केलेल्या युवकाने मुत्युपुर्वी  लिहीलेल्या सुसाईड नोट मध्येही रोहीनी वराळ हिच्याशी माझे प्रेमसंबंध आहेत व त्यामुळे  सचिन वराळ यांच्यासह इतरांनी मला मारहान केल्यामुळे मी आत्महत्या करित असल्याचे लिहीले आहे. मृताच्या वडीलांनी आपला जबाब बदलल्याने आरोपींना जामीन झाला असला तरी यातील खरे  आरोपी कोण ?हे शोधणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकजागृती सामाजिक संस्थेचे संस्थापक बबन कवाद यांनी या विषयी सखोल तपासाची मागणी करणारे पत्र सत्र , उच्च न्यायालय , व पोलिसांना लिहीले आहे. बबन कवाद हे या प्रकरणातील साक्षीदार आहेत.आकाश पवार यांने  आत्महत्या केल्याची माहीती संकेत सुपेकरने प्रथम कवाद यांना फोनवरून कळवली होती .मृताच्या वडीलांच्या अज्ञानाचा फायदा घेवून यातील आरोपींनी त्यांच्यावर दबाव आणला आहे .त्यामुळे या प्रकरणातील दोषी मोकाट आहेत व त्यामुळे मृताला न्याय मिळणार नाही अशी भितीही पत्रात व्यक्त केली आहे.फिर्यादीवर दबाव आणणारांचा शोध घेवून पोलिसांनी कडक कारवाई करावी व या प्रकरणात  स्वतः फिर्यादी होण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

तर खरे आरोपी कोण? 
या प्रकरणात फिर्यादीवर दबाव आणून  मयतावर अन्याय केला जात आहे,फिर्यादी ने जबाब बदलला आहे.त्यामुळे आरोपी मोकाट आहेत. तर मग खरे आरोपी कोण हे पोलिसांनी शोधावेत.
------------
-बबन कवाद.
साक्षीदार