Breaking News

राज्यात पावसाची जोरदार हजेरी



मुंबई : राज्यात मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूर, वाशिम-हिंगोलीपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. खरिप हंगामातील पिके काढण्याची कामे सुरु असताना पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. सोयाबीन, भात काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, वाशिम, हिंगोली जिल्ह्यात पाऊस झाला. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पाऊस झाला. पुण्यात तर जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन तीन दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.  कोल्हापूरमधील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. प्रचंड मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने तारांबळ नागरिकांची तारांबळ उडाली होती. औरंगाबादमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली आहे.