Breaking News

मराठा युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये : उदयनराजेसातारा: आरक्षणाचा प्रश्न मराठा युवकांसाठी महत्त्वाचा असला तरी धीर सोडून टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन शिवरायांचे वंशज आणि भाजप खासदार उदयराजे भोसले यांनी केले आहे. आरक्षण नसल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नसल्याच्या नैराश्यातून बीड येथील विवेक रहाडे या युवकाने आत्महत्या केली आहे. उदयनराजे यांनी ट्विट करून त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्याच्या कुटुंबियांना धीर दिला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ पाहणारा बीड जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील मराठा तरुण विवेक कल्याण रहाडे या बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली त्यांना आमच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या परिवारा सोबत आमच्या संवेदना आहेत 

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ पाहणारा बीड जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील मराठा तरुण विवेक कल्याण रहाडे या बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली त्यांना आमच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.