Breaking News

पारनेर तालुक्यातील आठवडे बाजार पुन्हा सुरू होणार ?

पारनेर तालुक्यातील आठवडे बाजार पुन्हा सुरू होणार?
--------------
स्थानिक प्राधिकरणाने याबाबतची नियमावली तयार करायची आहे
-------------
आठवडे बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी येत होत्या अडचणी.
---------------
तालुक्यातील १५ मार्च पासून आठवडे बाजार होते पूर्ण बंद.


पारनेर प्रतिनिधी -
    लॉकडाऊन काळात म्हणजे १५ मार्च पासून तालुक्यातील आठवडे बाजार बंद करण्यात आले होते आता अनलॉक मध्ये अनेक सेवा सुरळीत चालू केलेले आहेत त्याचप्रमाणे आठवडे बाजार ही सुरू करण्याबाबत जाहीर करण्यात आले तसे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले असून १५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील स्थानिक आठवडे बाजार सुरु होतील त्यामुळे पारनेर तालुक्यातील पारनेर,अळकुटी, सुपा, निघोज ,भाळवणी वडझिरे कान्हूर पठार आठवडे बाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र स्थानिक प्रशासन नियमावली तयार करून याबाबत काय निर्णय घेते याकडे सध्या तालुक्यातील नागरिकांचे लक्ष आहे.
कोरोनामुळे राज्यभर अचानक सर्व ठप्प झालेल्या गोष्टी शासन टप्प्याटप्प्याने सुरु करत आहे कोरोना च्या सुरुवातीच्या काळापासून आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले होते मात्र १५ ऑक्‍टोबरपासून आठवडे बाजार सुरू होण्यास जिल्हाधिकार्‍यांनीं परवानगी दिली आहे त्यानुसार पारनेर तालुक्यातील आठवडे बाजार सुरू होऊ शकतात मात्र स्थानिक प्राधिकरणाच्या निर्णयाकडे लक्ष आहे.
पारनेर तालुक्यातील आठवडे बाजार १५ मार्च पासून बंद करण्याचे आदेश तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिले होते. त्यानुसार अद्यापपर्यंत तालुक्यात बाजार भरलेला नाही.मात्र शासनाने हळूहळू सर्व सुरळीत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत कोरोनाकाळात बंद करण्यात आलेल्या सर्व गोष्टी हळूहळू सुरळीत व सुरू करण्याचे धोरण आखले आहे त्याप्रमाणे आठवडे बाजार हे सुरू करण्यात येणार आहेत यामुळे ग्राहकांबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे कारण आठवडे बाजारावर शेतकऱ्यांचा सर्व आर्थिक भार अवलंबून असतो शेतामध्ये पिकवलेला शेतमाल हा जवळच्या आठवड्या बाजारामध्ये शेतकरी स्वतः विक्रीसाठी घेऊन जातात त्यातून मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्याची रोजीरोटी चालत असते मात्र अनेक दिवसापासून आठवडे बाजार बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले पर्यायाने व्यापाऱ्यांना कमी दरात शेतमाल द्यावा लागत होता मात्र आता आठवडा बाजार सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होऊ शकतो तसेच अनेक व्यापारी हे ग्राहकांना चढ्या भावाने शेतमाल विकत होते मात्र थेट शेतकरी ते ग्राहक आठवडे बाजारातून देवाणघेवाण होणार आहे त्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा होईल व शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक मोबदला मिळेल.

 लॉकडाऊन काळामध्ये सर्व यंत्रणा बंद झाली त्याची झळ शहरा बरोबर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बसू लागली व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक संकट उभे राहिले त्याचा परिणाम शहराबरोबरच ग्रामीण भागावर ही झाला अर्थव्यवस्थेची चाके रुतली जाऊ लागली होती ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने गावातील बाजारपेठेवर अर्थव्यवस्था अवलंबून असते विशेषता आठवडी बाजारामुळे दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल होत असते मात्र गेल्या सात महिन्यांपासून तालुक्यातील सर्व आठवडी बाजार बंद होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्राधिकरणाने बाजार सुरू करण्यासाठी कोरोना संदर्भातील नियमाचे सक्तीने पालन याबाबतची नियमावली तयार करून यासंदर्भात प्रशासनाचे सर्व बंधने पाळून आठवडे बाजाराबाबत नियोजन करायचे आहे व त्यानंतर हा बाजार सुरू होईल त्यामुळे तालुक्याच्या ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरले जात होते तेथील स्थानिक प्राधिकारण कशा पद्धतीने नियोजन करतात व बाजार सुरू करण्याबाबत सूचना केल्या जातात ते महत्वाचे आहे.