Breaking News

पारनेर तालुक्यातील काल १३ अहवाल पॉझिटिव.

पारनेर तालुक्यातील काल १३ अहवाल पॉझिटिव.


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यातील काल दि.२७ प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार तालुक्यातील तेरा व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे  निष्पन्न झाले आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मंदावले आहे मात्र ठराविक गावांमध्ये रुग्ण संख्या आढळताना दिसत आहे.
 यामध्ये पारनेर शहर ८ गोरेगाव १ कान्हूर पठार २ टाकळीढोकेश्वर १ करंदी १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालामध्ये समावेश आहे.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन  हजार पार झाली आहे मात्र काही दिवसापासून तालुक्यातील रुग्णसंख्या मंदावली आहे ही समाधानाची बाब आहे तसेच काही गावांमध्ये सातत्याने रुग्ण संख्या आढळत आहे. तेथील स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पारनेर शहरात सापडलेल्या आठ रुग्णांमध्ये स्टेट बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.