Breaking News

कोपरगाव तालुक्यात आज फक्त १३ कोरोना बाधित !

कोपरगाव तालुक्यात आज फक्त १३ कोरोना बाधित


कोपरगाव श. प्रतिनिधी-
आज दिनांक ८ ऑक्टोबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण ३१४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ बाधित तर ३०७ अहवाल निगेटीव्ह तर नगर येथील अहवालात २ तर खाजगी लॅब च्या अहवालात ४ कोरोना बाधित आढळून आले आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
कोपरगाव शहर
येवला रोड-१
इंदिरा पथ-२
निवारा-१
शिंगी शिंदी  नगर-१
तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 
कान्हेगाव-३
कोळपेवाडी-१
दहेगाव-१
टाकळी-१
भोजडे-१
कोकमठाण-१
असे आज ८ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण १३ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.
आज रोजी एकूण ३८ स्राव पुढील तपासणी साठी नगर येथे पाठविली आहे.
   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील १६ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.
आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १९६९ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८७ झाली आहे.
आज  पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३५ झाली आहे.