Breaking News

शहरातील वकिलांच्या घरी धाडसी चोरी;प्राथमिक माहितीनुसार एक लाख रोख रक्कम व सोन्यावर चोरट्यांनी मारला डल्ला

शहरातील वकिलांच्या घरी धाडसी चोरी;प्राथमिक माहितीनुसार एक लाख रोख रक्कम व सोन्यावर चोरट्यांनी मारला डल्ला


पाथर्डी/प्रतिनिधी :
शहरातील नाथनगर येथील वकिलांच्या घरी काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी चोरी करत प्राथमिक माहिती नुसार सुमारे १ लाख रोख रक्कम व सोन्यावर डल्ला मारत पसार झाले आहेत.

   याबाबत प्राथमिक समजलेली अधिक माहिती अशी की,रात्री काही कामानिमित्त वकीलांच्या घरातील सर्वजण बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मेन दरवाजा कटावनीच्या साह्याने तोडून घरात प्रवेश करत बेडरूम मधील कपाटातील सोने व रोख रक्कम चोरी करत पसार झाले आहेत.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी व पोलीस हवालदार अरविंद चव्हाण यांनी भेट दिली..