Breaking News

शहरातील नाथनगर येथील चोरीचा पाथर्डी पोलिसांनी लावला एका दिवसांत तपास;दोघांना घेतले ताब्यात

शहरातील नाथनगर येथील चोरीचा पाथर्डी पोलिसांनी लावला एका दिवसांत तपास;दोघांना घेतले ताब्यातपाथर्डी /प्रतिनिधी :
शहरातील नाथनगर येथे बुधवारी रात्री अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख ८३ हजार पाचशे रूपयांचा ऐवज आकाश विक्रमराव डोंगरे यांच्या राहत्या घरातील कपाटातुन चोरून नेल्याच्या  फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केला होता.

      अप्पर पोलीस अधीक्षक राठोड,पोलीस उपविभागीय अधिकारी मदने,पो. नि. रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप,प्रल्हाद नागलोत,राहुल खेडकर,देविदास तांदळे,अतुल शेळके यांच्या पथकाने सदरच्या  गुन्ह्यांचा उलगडा एका दिवसांत केला आहे.

      सदर गुन्ह्यात मनोज उर्फ मनीष भिमसिंग परदेशी,गणेश संजय फुलारी यांना ताब्यात घेतले  असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी दिली आहे.