Breaking News

सिनेमागृहे पुन्हा सुरु होणार!

- केंद्र सरकारची नियमावली जाहीर

- ठाकरे सरकारनेही दिले सिनेमागृहे सुरू करण्याचे संकेत

 


मुंबई/नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक-5 अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यामध्ये 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, सिनेमा हॉल उघड्यास परवानगी दिली आहे. मात्र, थिएटरमध्ये 50 टक्केच प्रेक्षकांना परवानगी असणार आहे. मार्च महिन्यापासून शाळा, चित्रपटगृह बंद आहेत. आता त्यांना उघडण्यास परवानगी दिली  आहे. दरम्यान, मंगळवारी चित्रपटगृह सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारनेही सिनेमागृह सुरू करण्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे. सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी सिनेमागृह सुरू करण्याबद्दल संकेत दिले आहे.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की, सिनेमागृह सुरू करण्याबाबत केंद्राने निर्णय घेतला आहे. याचा विचार महाराष्ट्र सरकार गांभीर्याने करत आहे. आमची सिनेमागृह मालकांशी चर्चा झाली आहे.  नवरात्र, दसरा, दिवाळी हा चित्रपटांसाठी आणि नाट्यगृहासाठी मोसम असतो. त्यामुळे परवानगी द्यावी ही विनंती केली आहे. त्यांच्या मागणीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. लवकरच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेऊ. दरम्यान, 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. सिनेमागृहाच्या एकूण प्रेक्षक क्षमतेच्या 50 टक्के लोकांना एकावेळी सिनेमा पाहता येणार आहे. दरम्यान याकरता केंद्र सरकारकडून सिनेमांच्या प्रदर्शनासाठी एसओपी जारी करण्यात आली आहे. या नियमांनुसार काही कडक नियम पाळणे अनिवार्य असणार आहे.


केंद्राच्या नियमावलीतील महत्वाच्या बाबी- 
- चित्रपटगृहात केवळ 50 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती बंधनकारक
- चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक
- प्रेक्षकांना हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर पुरवण्यात यावे
- थर्मल स्क्रिनिंग करावी, केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाचा चित्रपटगृहांमध्ये प्रवेश