Breaking News

पारनेर तालुक्यात पावसाचे तांडव;लाखो रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान शेतकरी अडचणीत

पारनेर तालुक्यात पावसाचे तांडव;लाखो रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान शेतकरी अडचणीत
--------------
 रुई छत्रपती येथे शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेच्या गटारी वर केलेल्या अतिक्रमणामुळे पाणी शिरले रस्त्यात व घरात.
---------------
तालुक्यातील फळबागा शेतमाल फुलशेती रस्त्यांची पावसामुळे  दयनीय अवस्था!


पारनेर प्रतिनिधी : 
पारनेर तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अजूनही पाण्याखाली आहेत तर शेतमाल खराब झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले तसेच तालुक्‍यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे सतत पडत असलेल्या पावसामुळे काही रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे पावसाच्या तांडवामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबरच सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे कोरोना सोबतच आता अस्मानी संकटांचा तालुक्यातील सर्व घटकांना सामना करावा लागत आहे.


पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती येथे रुई ते माळवाडी हा एक ते दीड किलोमीटर चा रस्ता व त्या रस्त्याच्या कडेच्या गटारी तेथिल काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून मोडून काढल्या त्यामुळे तेथून वाहणारे पाणी शेतात व घरात घुसले आहे यासाठी रुई छत्रपती येथील ग्रामस्थांनी ज्या शेतकऱ्यांनी गटारीवर अतिक्रमण केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार व बांधकाम विभागाकडे केली आहे.
पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती येथे माळवाडी या रस्त्याचे खडीकरण झालेले आहे त्या रस्त्याच्या बाजूने काढण्यात आलेले चारी शेतकऱ्यांनी मोडून काढून तेथे वहिवाट केली आहे त्यामुळे रस्त्याच्या कडेने वाहून जाणारे पाणी तेथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या घरांमध्ये घुसले आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याचे घरामध्ये असणारे अन्नधान्य व सर्व वस्तू पाण्यात गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्या कुटुंबाला रस्त्यावर दिवस रात्र काढावी लागत आहे त्यांचे मोठे हाल झाले तसेच त्या रस्त्याच्या पुढे शंभर लोकांची लोकवस्ती आहे मात्र रस्त्याच्या कडेची गटार बुजवली असल्याने पाणी बाहेर जात नाही ते रस्त्यावर साठवले जात आहे काही शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे त्या शेतकऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी लक्ष्मण साबळे झुंबर भुजबळ अजित साबळे बबन साबळे यांनी केली आहे. 


दरम्यान पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथील बाबाजी बढे या शेतकऱ्याचे शेवग्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे चार महिन्याची शेवग्याची झाडे वादळामुळे मुळासकट उन्मळून पडली आहे या शेतकऱ्याचे जवळपास नऊशे झाडे होती त्यातील दोनशे झाडे जमीनदोस्त झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे झाडांची उंची नऊ फूट होती व शेंगा आल्या होत्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे त्याला पंचनामा करून त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे कोणतेही पीक शेतकऱ्याच्या हातात अद्याप आलेले नाही पावसाच्या या रौद्र तांडवामुळे शेतकरी हैराण झाला आहे त्याला यातून सावरण्यासाठी शासन पातळीवरून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे मात्र शासनाकडून अद्याप शेतकऱ्याला मदत मिळत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

 तालुक्यात झालेल्या गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या संततधार पाऊस अतिवृष्टी व वादळामुळे मोठी हानी झाली आहे तालुक्यातील शेतीचे व शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे अनेक फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत तर फळेदेखील गळून पडले आहेत यामध्ये डाळिंब सीताफळ चा समावेश आहे तसेच काही भागात ऊस ज्वारी कांदे टोमॅटो फुल शेती आदी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बऱ्याच ठिकाणी जमिनी अजूनही पाण्याखाली आहेत शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा व या सर्वांचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी व्यक्त करत आहेत.

 या संपूर्ण वर्षांमध्ये अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या हाताला शेतीतून काहीही लागले नाही शेती पूर्णपणे तोट्यात आहे खिशातील भांडवल मातीत गेले सुरुवातीला कोरोना मुळे लॉकडाउन असल्याने शेतमाल शेतातच खराब झाला त्यानंतर सतत पडणाऱ्या पावसाने थैमान घातले या निसर्गाच्या प्रकोपमुळे शेतकरी पूर्ण मेटाकुटीस आला आहे त्याला आधार फक्त शासनाचा उरला आहे शासनाने नुकसानीचे पंचनामे केले पाहिजे परंतु हे करत असताना सरसगट शेतकऱ्यासाठी यावर्षी आर्थिक पॅकेज त्वरित जाहीर केले पाहिजे.
-------------
अनिल देठे पाटील
शेतकरी नेते