Breaking News

हाथरस अत्याचार प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देऊन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी : दिपकराव गायकवाड

हाथरस अत्याचार प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देऊन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी : दिपकराव गायकवाड.


कोपरगाव / ता.प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा  तीव्र निषेध करत सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, माणुसकीला काळिमा फासणार्‍या या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आर पी आय प्रदेश सचिव दीपकराव गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली.
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा येथे राहणार्‍या दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली.  तिच्यावर चार नराधमांनी अत्याचार करून तिची जीभ कापून, हाड मोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीला उपचारासाठी अलीगढच्या जेएन मेडिकल रुग्णालय व सफदरजंग रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना या पीडित तरुणीची प्राणज्योत माळवली. या घटनेची माहिती मिळून देखील उत्तरप्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता. यापुढे जाऊन पोलिसांनी पीडितेचा मृतदेहावर त्यांच्या नातेवाईकांना न सांगता गुपचूप त्यावर अंत्यसंस्कार केले असल्याची माहिती मिळते. यावरून उत्तर प्रदेश पोलीसांनी आपली कामगिरी चोखपणे निभावली नसल्याचे दिसून येते.त्यामुळे सदर प्रकरणाचा सीबीआयकडे सोपवण्यात यावा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.अशी मागणी गायकवाड यांनी केली