Breaking News

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पेपर व्हॉट्सपवर व्हायरल

 - अहमदनगर येथील घटना

- चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल


अहमदनगर/ प्रतिनिधी

अहमदनगरमध्ये वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पेपर सुरु होताच व्हॉट्सपवर व्हायरल झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौघांवर भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका विद्यार्थिनी आणि तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

अहमदनगरमध्ये वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा कॉस्ट अँड वर्क अकाऊंटचा शुक्रवारी पेपर आयोजित केला होता. सकाळी या परीक्षेच्या पेपरला सुरुवात झाली. हा पेपरचे वाटप करण्यात आल्यानतंर लगेचच तो एका विद्यार्थिनीने व्हाट्सपवर शेअर केला. या प्रकरणात एका विद्यार्थिनीचा आणि तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच आणखी काही विद्यार्थी सहभागी असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बुम्हाणनगर येथील बाणेर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मच्छिंद्र जाधव यांनी तक्रार दाखल केली असून, त्यानुसार शहर पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी तपासासाठी पथके रवाना केली होती.