Breaking News

सभापतीच्या दौऱ्याची ग्रामपंचायतला कल्पनाच नाही, सरपंचांनी केली नाराजी व्यक्त !

सभापतीच्या दौऱ्याची ग्रामपंचायतला कल्पनाच नाही, सरपंचांनी केली नाराजी व्यक्त

[ दवाखान्यांना राजकीय दौऱ्या पासुन दुर ठेवा
राजकीय व्यक्तींना अशा दौऱ्या मध्ये समाऊन घेऊ नये तालुक्यात चुकीचा पायंडा पडेल लोकप्रतिनीधींना लिहीले पञ ]


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात अद्यापही कोरोना विषाणूची साथ  मोठ्या प्रमाणात वाढत असून या साथीला आटोक्यात आणन्यासाठी शासनाने वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना केल्या असुन त्याची माहीती अथवा मार्गदर्शन करण्यासाठी विविध संस्था,संघटना ग्रामपंचायत,पंचायत समिती आपआपल्या परिने मार्गदर्शन करते माञ हे करीत असताना आपण ज्या गावातील माहीती घेणार आहे मार्गदर्शन करणार आहे त्याची पुसटशी कल्पना त्या गावच्या स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या व गावक-यांची एका कुटुंबा प्रमाणे काळजी घेणाऱ्या    ग्रामपंचायतला देणे आवश्यक  असुन पंचायत  समितीच्या सभापतींनी आरोग्याचा आढावा घेण्यासाठी जो दौरा करुन माहीती घेतली त्याची कुठलीच कल्पना गाव मुखीया असलेले सरपंच अथवा ग्रामपंचायत ला न दिल्याने चासनळी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच निळकंठ चांदगुडे यांनी   नाराजी व्यक्त  केली.


पंचायत  समितीच्या सभापती सौ. पौर्णिमा  जगधने यांनी कोपरगाव तालुक्यातील चासनळी  प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी केली व कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला.कोरोना नसलेल्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार करा, माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्व कुटुंबाची  तपासणी करा, एकही कुटुंब तपासणीविना राहणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना सौ. पौर्णिमा  जगधने यांनी यावेळी दिल्या या पहाणी व उपाय योजना दौऱ्यात  जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य कारखान्याचे संचालक आरोग्य कर्मचारी एवढे उपस्थित असताना स्थानिक स्वराज्य संस्थेचा घटक असलेल्या ग्रामपंचायतला सोडाच परंतु  शासनाने स्थानिक पातळीवर स्थापन केलेल्या  कोरोना दक्षता  समितीलाही याची कल्पनाच दिली नसल्याचे चासनळी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच निळकंठ चांदगुडे यांनी सांगितले.तर ग्रामपंचायत हि कायद्याने स्वतंत्र  स्थानिक स्वराज्य  संस्था आहे सर्व स्थानिक अस्थापना सर्व सरकारी व निमसरकारी ह्या ग्रा.पं.च्या अधिपत्याखाली चालतात महाराष्ट्र शासन व जि.प.अहमदनगर यांचे माध्यमातून परिसरातील गरजु रुग्नांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची इमारत उभारली अशा दवाखान्यांना राजकीय दौऱ्या पासुन दुर ठेवावे जेणे करुन रुग्नांची हेळसांड होणार नाही सभापतींनी अशा दौऱ्या पासुन राजकीय व्यक्तींना दुर ठेवावे जेणेकरुन तालुक्यात  चुकीचा पायंडा पडला जाणार नाही अशा सुचना आपण कराव्या आशा आशयाचे पञही सरपंच निळकंठ चांदगुडे उपसरपंच मनोज गाडे यांनी आपल्या सही निशी आमदार आशुतोष काळे यांनाही दिले आहे