Breaking News

पारनेर शिक्षकेतर संघाच्या अध्यक्षपदी शंकर शिंदे तर सचिवपदी संतोष खोडदे याची निवड.

पारनेर शिक्षकेतर संघाच्या अध्यक्षपदी शंकर शिंदे तर सचिवपदी संतोष खोडदे याची निवड.
--------------- 
पारनेर येथे पार पडली शिक्षकेतर संघाची कार्यकारिणी निवडीची बैठक.


पारनेर प्रतिनिधी -
    पारनेर तालुक्यातील शिक्षकेतर संघाची बैठक पारनेर न्यू इंग्लिश स्कूल येथे पार पडली या बैठकीमध्ये नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली यावेळी अध्यक्षपदी शंकर शिंदे तर सचिवपदी संतोष खोडदे यांच्या नावाची नियुक्ती करण्यात आली.
पारनेर शिक्षकेतर संघाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने नवीन निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ही बैठक रविवार दि. १८ रोजी न्यू इंग्लिश स्कूल पारनेर येथे पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे गोवर्धन पांडुळे, अहमदनगर जिल्हा शिक्षकेतर संघ सचिव भानुदास दळवी, प्रसिद्धीप्रमुख अमोल नलगे,जिल्हा सहसचिव महेंद्र बोरुडे,जिल्हा उपाध्यक्ष जयराम धांडे यांच्या उपस्थितीत पार पडली.


यावेळी सेवा पुस्तकांबाबत मार्गदर्शन सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती व अडचणी याबाबत चर्चा तसेच नियमित वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून करणे बाबत मार्गदर्शन सचिव भानुदास दळवी यांनी केले
नवीन कार्यकारणीने तालुक्यातील सर्व व शिक्षकेतर बंधूंचे प्रश्न मार्गी लावणे बाबत पाठपुरावा करावा तसेच राज्यस्तरावरील काही प्रश्न असतील त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल असे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे यांनी सांगितले.


नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष शंकर शिंदे,उपाध्यक्ष एस. बी.भालेकर,भरत उचाळे, सचिव संतोष खोडदे, सहसचिव रंगनाथ दाते ,बापू दुधाडे ,खजिनदार संजय चव्हाण, कार्यकारिणी सदस्य मारुती जोरी, बाबाजी पवार,शैलेंद्र गायकवाड,चंद्रकांत गुंजाळ ,हिशोब तपासणीस योगेश भालेकर यांच्या निवडी करण्यात आले आहे.
यावेळी अरुण पठारे,कदम आर.बी,संभाजी बेलोटे, सी.डी.गुंजाळ, एस.डी.साठे,व्ही.रा.कांबळे,बाळू ठेंगे,बी.जे थोरात,गणेश पुणेकर, सावळेराम चौधरी,आदी उपस्थित होते यावेळी नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.