Breaking News

पारनेर तालुक्यात काल १४ अहवाल पॉझिटिव्ह.

पारनेर तालुक्यात काल १४ अहवाल पॉझिटिव्ह.
----------------
पारनेर शहरामध्ये सातत्याने रुग्ण आढळत आहे.


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यांमध्ये काल दि.२५ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार १४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पॉझिटिव्ह अहवालामध्ये पारनेर शहर ४ हंगा २ निघोज २ जामगाव १ वडगाव दर्या १ कान्हूर पठार १ आळकुटी १ लोणी हवेली १ देवीभोयरे १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालामध्ये समावेश आहे.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली तरी काही गावांमध्ये अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे यामध्ये पारनेर शहरामध्ये सातत्याने रुग्ण संख्या वाढत आहे त्याचप्रमाणे गेल्या चार दिवसा पूर्वी देवीभोयरे येथे देखील रुग्ण संख्या झपाट्याने वाढली होती तसेच दि. 23 रोजी जवळा व आळकुटी येथेदेखील संख्या वाढताना दिसत आहे त्यामुळे येथील स्थानिक प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे नागरिकांनीदेखील प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.