Breaking News

अकोल्यात कोरोनाचा २४ वा बळी !

अकोल्यात कोरोनाचा २४ वा बळी


अकोले/ प्रतिनिधी :
तालुक्यात कोरोनाचा आज २४ वा बळी  गेला. तर आज नवीन २७ बाधित रुग्ण आढळले मवेशी येथे  शनिवारी कोरोना  पॅाझिटीव्ह आलेल्या   ८२ वर्षीय व्यक्तीचा  कोरोना उपचार सुरु असताना मृत्यू झाला.  तालुक्यातील कोरोनाचा हा २४ वा बळी  ठरला  आहे.तर तालुक्याची  एकुण रुग्णसंख्या १७४९. झाली आहे.
दिवसभरात पुढील गावामध्ये कोरोना रुग्ण आढळले.
आज मंगळवारी  अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील व  रॅपिड अँटीजन टेस्ट, तसेच खाजगी प्रयोग शाळेतील आलेल्या अहवालात कुंभेफळ येथे -१  ,गर्दणी येथील- १,तांभोळ येथील -१ ,रेडे येथील- १,वाशेरे येथील-३, भंडारदरा कॅालणीतील- २ ,शेंडी येथील -१ ,पिंपळगाव खांड येथील- १ ,कोतुळ येथील- २ ,वाघापुर येथील- ३ लिंगदेव येथील- २ , ठाणगाव -१ ,ब्राम्हणवाडा येथील - १,लाडगाव येथील -१   सुगाव येथील- १ , खानापुर येथील -१, अकोले येथील- १, करंडी येथील- १  गणोरे - १, कुंभेफळ येथील -१ आशा  व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला असुन तालुक्यात आज दिवसभरात एकुण २७ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला 
       खानापुर कोविड सेंटर येथून  ५१, राजुर ग्रामीण रुग्णालयातुन ०२ ,कोतुळ ग्रामीण रुग्णालयातुन १० अशी ६३ व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे..
------------