Breaking News

वाळूचा डंपर पकडल्यानंतर नायब तहसीलदार यांना धक्काबुक्की.

वाळूचा डंपर पकडल्यानंतर नायब तहसीलदार यांना धक्काबुक्की.


पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार माळवे यांनी ढवळपुरी भागातून बेकायदा अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून तहसील कार्यालयाकडे आणत असताना आठ जणांनी त्यांना गाडी आडवी लावून धक्काबुक्की करून त्यांचा मोबाईल काढून घेऊन डंपर मधील वाळू खाली करून डंपर पळवून नेला याबाबत आरोपींविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पारनेर नायब तहसीलदार माळवे यांनी ढवळपुरी भागातून बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर पडला व तो डंपर तहसील कार्यालयाकडे आणत असताना स्कुटी व वेरना गाडी डंपर समोर आडवी लावून राजु पाचरणे वैभव पाचारणे नवनाथ कुटे रोहित आमले प्रितम नेटके प्रविण कुटे  संदीप पालवी तिथे गेले.माळवे नायब तहसिलदार यांना धक्काबुक्की करुन खाली पाडले.व त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला व डंपर तिथे ओतुन तो पळवुन नेला याबाबत माहिती मिळताच तहसीलदार ज्योती देवरे या तात्काळ घटनास्थळी गेल्या व त्या ठिकाणी त्यांना हा सर्व प्रकार पाहणारा विठ्ठल कुटे मिळून आला आहे याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.