Breaking News

पाडळी आळे येथे कॅनल मध्ये सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह.

पाडळी आळे येथे कॅनल मध्ये सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह.


पारनेर प्रतिनिधी-
 पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथील डेरेमळा कुकडी कॅनल मध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला याबाबत स्थानिकांनी पारनेर पोलीस स्टेशनला माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धावघेत मृतदेह ताब्यात घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. १ रोजी सकाळी अकरा वा. च्या सुमारास बाळासाहेब बबन गुजर वय ४० वर्ष धंदा - शेती, रा पाडळी आळे तालुका पारनेर,जिल्हा अ. नगर यांना हा मृतदेह कुकडी कॅनॉल मध्ये आढळून आला त्यांनी याबाबत त्वरित पोलिसांना माहिती कळवली त्यानंतर पारनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला हा मृतदेह पुरुष जातीचा असून वय अंदाजे 30 आहे याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल डी ए उजगरे करत आहेत.
दरम्यान कुकडी कॅनॉल मध्ये सापडलेला मृतदेह हा अनोळखी व्यक्तीचा असून मृतदेह कुकडी कॅनल मध्ये वाहत आला असून तो डेरेमळा येथे सापडला मृतदेह नेमका कोणाचा याबाबत पोलीस तपास करत आहेत मात्र यामागे काही घातपात आहे का हादेखील संशय व्यक्त होत आहे काही दिवसापूर्वी निघोज येथे कुंड परिसरामध्ये पाण्यात अनोळखी मृतदेह सापडला होता पोलीस तपासामध्ये त्या व्यक्तीचा मुलांनी खून केल्याचे निष्पन्न झाले होते त्यामुळे हा मृतदेह नेमका कोणाचा व कशामुळे मृत्यू झाला आहे या सर्व गोष्टी पोलिस तपासामध्ये उघड होतील.