Breaking News

पारनेर येथे सायकल ढकलून दिल्याच्या वादातून एकास बेदम मारहाण चार जणांविरोधात गुन्हा दाखल

पारनेर येथे सायकल ढकलून दिल्याच्या वादातून एकास बेदम मारहाण चार जणांविरोधात गुन्हा दाखल.


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर येथील राहुल नगर मध्ये सायकल  ढकलून दिलेल्या वादातून झालेल्या भांडणात एकास दगड मारून जखमी केले त्याने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद बबन दादाभाऊ उमाप वय तीस धंदा मजुरी रा.राहूल नगर जामगाव रोड तालुका पारनेर यांनी दिली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि २४  रोजी बबन दादा भाऊ उमाप याची मुलगी घरासमोर उभी असताना  घरासमोर त्याचा भाऊ दीपक दादाभाऊ उमप यांची सायकल पडल्याने कल्याणी ही त्याची तीन नंबरची मुलगी येऊन म्हणाली की तू सायकल का ढकलून दिली त्यावर बबन उमाप तिला समजावून सांगत असताना, ती सायकल जोराचा वारा आल्याने पडली आहे.असे म्हटले मात्र आरोपी कल्याणी दीपक उमाप ही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती, बबन मागे घरात जायला फिरले असता तिने शेजारीच पडलेला दगड हातात धरुन बबन च्या डोक्यात मारल्याने त्याच्या डोक्यात दुखापत झाली व त्यानंतर डोक्याला लागलेले असताना बबन उमाप खाली बसलेले असताना आरोपी दीपक दादाभाऊ उमाप स्नेहल दिपक उमाप महेश दिपक उमाप सर्व राहणार राहुल नगर जामगाव रोड तालुका पारनेर हे बाहेर येऊन काही एक न बोलता बबन उमाप याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्याचा शर्टाचा खिसा हाणामारीत फाटल्याने ओप्पो कंपनीचा मोबाईल उचलून फोडून नुकसान केले बबन उमाप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस वी गुजर करत आहेत.