Breaking News

सैनिक बँक व्यवस्थापनाकडून खातेदार व जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार- अरुण रोडे

सैनिक बँक व्यवस्थापनाकडून खातेदार व जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार- अरुण रोडे
-------------
सैनिक बँक चेअरमन व व्यवस्थापक आपली प्रतिमा उजळवन्यासाठी काही ठराविक सभासदांना चुकीचे मार्गदर्शन.
-------------
आमच्यावर बँकेची बदनामी करतो म्हणुन प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी चुकीची.
-------------
न्यायालयाने पीडित तक्रारदार यांच्या कागदपत्रांची दखल घेऊन पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी करून सर्वांचे जबाब घेऊन गुन्हे  दाखल करावी अशी ओर्डर केली.
--------------
पिडीत लोकांच्या न्याय हक्कासाठी संघटना लढा देणार अरुण रोडे यांची माहिती.


पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या माध्यमातून अध्यक्ष,व्यवस्थापक व काही आधिकारी यांनी शेतकरी कर्जदार यांच्या जमीनी कवडीमोल भावात विक्री करून या जमिनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर करून गीळणकृत केल्या आहेत. त्यामुळे अन्याय झालेल्या पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटाना लढा देत असल्याचे अन्याय निवारण,निर्मूलन सेवा समितीचे  जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी सांगितले.
    सैनिक बँक चेअरमन व व्यवस्थापक आपली प्रतिमा उजळवन्यासाठी काही ठराविक सभासदांना चुकीचे मार्गदर्शन करून  आमच्यावर बँकेची बदनामी करतो म्हणुन प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी केली जात आहे.          
    आम्ही सर्व सभासदाना सांगू इच्छितो की बँकेच्या जागरूक सभासद व काही पीडित कर्जदारानां सहकार विभागाकडून अनेक वर्ष  न्याय न मिळाल्याने  त्यांनी शेवटी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून  दाद मागितली होती . औरंगाबाद उच्च न्यायालयाने पीडित कर्जदारांच्या  तक्रारी व कागदपत्राची दखल घेऊन पारनेर पोलीसांना सर्व बँक कागद पत्राची तपासणी करून सर्वांचे जबाब घेऊन आर्थिक गैरव्यवहार झाला तरच गुन्हे दाखल करावेत अशी आर्डर केली .त्यामुळे पारनेर पोलिसांनी तक्रारदार  यांची  दखल घेऊन  बँकेतील कागद पत्राची तपासणी करून ज्या ज्या प्रकरणात गैरव्यवहार  दिसून आला त्या त्या  प्रकरणाची फाइल बनवून जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठवल्या होत्या व पाठवल्या आहेत. त्या फाईल मधील रेकॉर्डच्या आधारे व्यवहारे,कोरडे यांच्यावर ३ ते ४ गुन्हे दाखल आहेत व अजुन काही गुन्हे दाखल होणार आहेत त्यामुळे आम्ही त्या सभासदाना  अवाहन करतो व्यवहारे,कोरडे यांनी कायदेशीर काम केले तर कर्जदार, खातेदार फसवणूक प्रकरणी आतापर्यंत व्यवहारे,कोरडे यांच्यावर ३ ते ४ गुन्हे का दाखल आहेत याचा जाब व्यवहारे व कोरडे यांना विचारावा व बँकेच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात म्हणून दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर  सहकार विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी करावी.

चौकट- बँकेची बदनामी करून खोटा गुन्हा दाखल केला आहे अशा प्रकारची काही मंडळी चर्चा घडवून आणत आहे हा प्रस्ताव पीआय कडून जिल्हा अधीक्षकांकडे गेला नंतर सर्व पडताळणी करून गुन्हा दाखल केला गेला आहे ज्या गोष्टीची चर्चा केली जाते ते दुसरे प्रकरण आहे पुरुषोत्तम शहाणे यांचा त्याच्याशी काही संबंध नाही बँक व्यवस्थापनाकडून खातेदार व जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार चालू आहे आम्ही या प्रकरणात सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे सत्य हे कधी ना कधी उजडात येत असते.
अरुण रोडे
 जिल्हाध्यक्ष अन्याय निवारण,निर्मूलन सेवा समिती