Breaking News

पारनेर तालुक्यातील काल २१ अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यातील काल २१ अहवाल पॉझिटिव्ह.


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यामध्ये काल दि. ३ रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार २१ व्यक्तींना कोरोना ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे तालुक्यामध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या यामुळे १७३४ झाली आहे.
काल प्राप्त झालेल्या कोरोना चाचणीच्या अहवालानुसार भाळवणी ३ पारनेर शहर ३ सुपा ६ राळेगण-सिद्धी १ कान्हूर पठार ३ वडझिरे २ राळेगण थेरपाळ १ कर्जुले हर्या १ दैठणे गुंजाळ १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालामध्ये समावेश आहे.
पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार सुपा पारनेर या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे तरीही येथील नागरिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करत नाहीत पोलीस प्रशासनाने याबाबत कारवाई सुरू केलेली आहे नागरिकांकडून दंड वसूल केला जातो तसेच गुन्हे दाखल झाले आहेत मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.