Breaking News

पारनेर तालुक्यातील पी एम किसान योजनेत फसवणूक करून शासनाचे पैसे घेतलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली

पारनेर तालुक्यातील पी एम किसान योजनेत फसवणूक करून शासनाचे पैसे घेतलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली.
------------------
तहसिलदार यांनी केले तालुक्यातील गावागावात जाऊन अपात्र शेतकऱ्यांची नावे जाहीर.
------------------
तालुक्यात दोन कोटी पेक्षा जास्त करदाते व अपात्र शेतकऱ्यांनी घेतले पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे.
-------------------
जिल्ह्यात पारनेर तालुक्यात सर्वात जास्त करदात्यांनी या योजनेचा घेतला लाभ त्यांच्याकडून होणार आता वसुली.


पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यांमध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे त्याची वसुली करण्यासाठी पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी दि.२३ रोजी तालुक्यातील वाडेगव्हाण येथे जाऊन करदाते व अपात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी वाचली तसेच ग्रामपंचायत व बँकांना याबाबत कळविण्यात आले आहे व या अपात्र शेतकऱ्यांना त्वरित शासनाचे घेतलेले पैसे मागे करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या पारनेर तालुक्यात आहेत जवळपास २३८७ करदाते आहेत तसेच २१९ अपात्र लोकांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे तालुक्यात २ कोटी २६ लाख १४ हजार रुपयांची वसुली केली जाणार आहे यासाठीचे आदेश तहसीलदार यांना शासन स्तरावरून देण्यात आले आहे त्यानुसार पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी वाडेगव्हाण येथे जात येथील शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली वाडेगव्हाण येथे तालुक्यातील सर्वात जास्त कर भरणारे व अपात्र शेतकरी संख्या आहे  त्यामुळे या गावापासून मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे संबंधितांनी  त्वरित शासनाच्या घेतलेल्या रकमेचा भरणा करण्याचे यावेळी तहसीलदार यांनी या शेतकऱ्यांना सांगितले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजने साठी शेतकरी हा करदाता नसावा अशा प्रकारचा निकष होता तसेच तो नोकरदार व निवृत्त वेतनधारक नसावा त्याचे वेतन दहा हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे आजी माजी आमदार व खासदार मंत्री जिल्हा परिषद सदस्य निवृत्त सहकारी अधिकारी डॉक्टर वकिलांना या योजनेतून वगळले होते मात्र त्यानंतरही काही अपात्र लोकांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे शासनाच्या निदर्शनास आले व त्यानंतर शासनस्तरावरून या लोकांची यादी तयार करून त्यांच्याकडून वसुली करण्याचे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
त्यानुसार या रकमेची वसुली केली जात आहे पी.एम.किसान योजनेचे पैसे है गरीब शेतकऱ्यांसाठी होते मात्र तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित व नोकरदार यामध्ये शिक्षक पोलीस सैनिक सेवानिवृत्त लोकांनी योजनेचा लाभ घेतला असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे त्यामुळे 
त्यांच्याकडून आता घेतलेले रकमेची वसुली केली जाणार आहे.

 तालुक्यातील पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी आहेत  किंवा जे इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे लाभार्थी आहेत मात्र त्यांनी योजनेअंतर्गत पैसे घेतले आहेत त्यांच्याकडून ते पैसे पुन्हा भरून घेण्यासाठी चे आदेश प्राप्त झाले आहेत त्यानुसार प्रत्येक गावात त्या लोकांच्या यादी वाचण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे तसेच गावातील मंदिरात लाऊडस्पीकर वर या लोकांची नावे वाचून घेण्यात येणार आहेत तोपर्यंत हे लोक पैसे भरणार नाहीत तोपर्यंत त्यांची नावे तेथील लाऊडस्पीकरवर  वाचण्यात येणार आहे त्यामुळे ज्यांची नावे आहेत त्यांनी त्यांच्याकडे शासनाचे चुकून गेलेले पैसे त्वरित बँक खात्यावर भरणा करावेत.
-----------------
ज्योती देवरे 
तहसीलदार पारनेर

      पंतप्रधान सन्मान योजने अंतर्गत करदात्यांना वगळण्यात आले तसे शासनाने स्पष्ट केली होते तरीही पारनेर तालुक्यातील सर्वात जास्त करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला रक्कम शासनाने त्यांच्या खात्यावर जमा केली आहे करदात्यांकडून दोन कोटी दहा लाख चोवीस हजार रकमेची वसुली करण्यात येणार आहे अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्याने सर्वात जास्त करदात्याने पी एम किसान योजनेचा फायदा उचलला आहे ज्या करदात्याने व अपात्र शेतकऱ्यांनी शासनाकडून ही रक्कम घेतली त्या सर्वांचे यामुळे धाबे दणाणले आहे या सर्वांना ही रक्कम पुन्हा शासनाला भरावी लागणार आहे.