Breaking News

कोपरगाव तालुक्यात होत असलेल्या गायींच्या तस्करी संबंधी कारवाई चे आदेश द्या !

कोपरगाव तालुक्यात होत असलेल्या गायींच्या तस्करी संबंधी कारवाई चे आदेश द्या !
----–--------
शिवसेना शहर प्रमुख दडियाल यांची खा.लोखंडेंकडे मागणी !


कोपरगाव / ता.प्रतिनिधी 
उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या सूचनेप्रमाणे नुकतीच कोपरगाव शहर शिवसेनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार  सदाशिव लोखंडे यांनी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी कोपरगावात होत असलेल्या गो तस्करीची माहिती खासदार सदाशिव लोखंडेंना दिली व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. 
    यावेळी शिर्डी विधानसभा संघटक कमलाकर कोते,शिर्डी तालुकाप्रमुख संजय शिंदे, ग्राहक!  संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, युवानेते विक्रांत झावरे,उपशहरप्रमुख विकास शर्मा,गोपाल वैरागळ,भूषण पाटणकर,शहर संघटक नितीन राऊत, बाळासाहेब साळुंके,सह संघटक वैभव गिते,विशाल झावरे,वाहतूक सेना तालुका प्रमुख इरफान शेख,समीर शेख,अमोल गायके,पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी,भास्कर मोतकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.