Breaking News

जामखेडच्या वकिलाचा पुण्यात अपहरण करून खून,मृतदेह टाकला जाळून

जामखेडच्या  वकिलाचा पुण्यात अपहरण करून खून,मृतदेह टाकला जाळून

जामखेड/प्रतिनिधी :
पुण्यातील वकिलाचा अपहरण करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमेश चंद्रशेखर मोरे (रा. बालाजीनगर धनकवडी) मुळ रा. जामखेड, जिल्हा अहमदनगर असे खून झालेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी कपिल विलास फलके (३४, रा. चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (२८. रा. आष्टी बीड) , रोहीत दत्तात्रय सेंडे (३२. रा.  मार्केटयार्ड) या तिघांना अटक केली आहे. 
जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आरोपींनी मोरे यांचा मृतदेह जाळून टाकल्याचे पोलिसांनी सांगितले.