Breaking News

राज्यात यापुढे लॉकडाऊन नाही!

 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक!

- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

- आरटीपीसीचे दर आठवडाभरात आठशे रुपयांवर

- टीआरपीचा खेळ करणार्‍यांची कायदा गय करणार नाही

अहमदनगर/ प्रतिनिधी

आता लॉकडाऊनचा विषय राहिला नसून, महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होणार आहे, असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. तसेच कोरोना चाचणीचा दर 800 रुपयांपर्यंत खाली आणल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनलॉकबद्दल महत्त्वाची माहिती दिली. राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूया, असे वक्तव्य टोपे यांनी केले. त्याचबरोबर कोरोना व्हायरसवर अजून लस आलेली नाही, त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे, असेआवाहन सुद्धा टोपे यांनी केले. आरोग्यमंत्र्यांनी टीआरपी प्रकरण तसेच भाजपवर देखील टीका केली.  काही न्यूज चॅनलच्या टीआरपी संदर्भात दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे, असे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. तसेच कायद्याच्या अनुषंगाने धूळ फेकण्याची काम काही चॅनल्सने केला. त्यामुळे त्यांच्यावर कठोरतील कठोर शिक्षा होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. एन-95 मास्क हा बाजारात 150 ते 200 रुपयाला मिळतो. परंतु, त्याची बनविण्याची किंमत 12 रुपये इतकी आहे. एमआरपी नुसार तो 19 रुपयांपर्यंत विकला पाहिजे, असे असताना पुरोगामी महाराष्ट्रात सारख्या पुरोगामी राज्याला हे बिल्कुल मान्य नाही. त्यामुळे आता त्यासाठी समिती स्थापन करून अशा विक्रेत्यांना दिशा, आणि निर्देश दिल्याचेदेखील टोपे यांनी यावेळी सांगितले. तसेच आता शाळा, मंदिरे टप्प्यांमध्ये उघडणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली. 


खडसे: राष्ट्रवादी योग्य व्यक्तींचे स्वागतच करतो!

भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या पक्षावर विशेष करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. यासंदर्भात प्रश्‍न विचारल्यानंतर त्यांनी खडसेंचे नाव न घेता ’राष्ट्रवादी पक्ष योग्य लोकांचे नेहमीच स्वागत करत आला आहे, असे वक्तव्य केले. असल्याचे सांगत खडसे मुद्यावर एक प्रकारे पृष्ठी देण्याचे काम केले आहे.