Breaking News

पळशी येथून देशी दारू पोलिसांनी केली जप्त एकास अटक.

पळशी येथून देशी दारू पोलिसांनी केली जप्त एकास अटक.


पारनेर प्रतिनिधी -
    पारनेर तालुक्यातील पळशी येथे २३९६ रुपये किंमतीची देशी दारू पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जप्त केली याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील पळशी येथे आरोपी पोपट ऊर्फ पप्पु भाऊ साहेब गायकवाड वय २२ रा भिल्ल वस्ती पळशी ता. पारनेर जि.अहमदनगर हा घराचेआडोशाला विनापरवाना  २३९६ रुपये किमतीची जीएम संत्रा कंपनीच्या ४६ सीलबंद बाटल्या देशी दारू आपले कब्जात बाळगून तिची विक्री करताना मिळून आला याबाबतची फिर्याद पोकॉ.सुरज दिलीप कदम‌ यांनी दिली आहे त्यावरून पाणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल कडूस करत आहेत.