Breaking News

काल पारनेर तालुक्यातील ११ अहवाल पॉझिटिव्ह.

काल पारनेर तालुक्यातील ११ अहवाल पॉझिटिव्ह.


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यातील दि.१४ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणीच्या अहवालानुसार ११ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
काल दि. १४ रोजी प्राप्त झालेल्या पॉझिटिव अहवालामध्ये पारनेर शहर ४ नारायणगव्हाण १ सुपा २ मुंगशी १ वाडेगव्हाण १ पळशी १ गांजीभोईरे १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
पारनेर शहरामध्ये सातत्याने रुग्ण आढळून येत आहेत दुसरीकडे तालुक्यात काही दिवसांपासून रुग्ण संख्येत होणारी घट व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे मात्र तरीही नागरिकांनी कोरोना बाबत हलगर्जीपणा न करता काळजी घेणे गरजेचे आहे तसेच कोरोना चे लक्षणे दिसत असतील तर त्वरित चाचणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.