Breaking News

आ.निलेश लंके यांना शरद पवारांची कौतुकाची थाप म्हणून कार्डियाक ॲम्बुलन्स दिली भेट !

आ.निलेश लंके यांना शरद पवारांची कौतुकाची थाप म्हणून कार्डियाक ॲम्बुलन्स दिली भेट !
---------–---
 पुणे येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,खा. सुप्रीयाताई सुळे यांच्या हस्ते आ.लंके यांना ॲम्बुलन्स केली सुपुर्द !


पारनेर प्रतिनिधी :
         महाराष्ट्रात अध्यावत असणाऱ्या शरदचंद्रजी पवार सेंटर चालू करून पारनेर नगर मतदार संघासह इतर अनेक तालुक्यातून गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सामील होणारे व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राला माहीत असणारे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या कार्याची दखल घेत देशाचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आमदार लंके यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत कौतुकाची थाप म्हणून व त्यांच्या कार्यात हातभार लावावा म्हणून शुक्रवारी कार्डियाक ॲम्बुलन्स भेट दिली .
      कोरोना संकटाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमदार निलेश लंके यांनी उभ्या महाराष्ट्राला आदर्श ठरावा असे केलेल्या कामाची पवार कुटुंबीयांनी दखल घेतली असून याचीच पावती म्हणून पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पारनेरकरांच्या सेवेसाठी ॲम्बुलन्स भेट देण्यात आली. हा लोकार्पण सोहळा आज पुण्यात पार पडला.


कोरोनाच्या काळात परप्रांतीय मजुरांच्या राहण्या-खाण्याची सोय,निवारा केंद्र,आनंदी थाळी ते अनवानी चालणाऱ्यांना चप्पल, कपडे,औषधे वाटण्याचे काम आ. लंके यांनी केले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुपे येथे सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्राचा सुमारे अडीच लाख गरजूंनी लाभ घेतला. परप्रांतीयांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचे मोठे काम देखील आ. लंके व सहकाऱ्यांनी केले होते.
       संकटाच्या काळात मतदारसंघा बरोबरच शेजारील तालुक्यातील रुग्णांना आधार मिळावा यासाठी 1 हजार बेड असणारे राज्यातील सुसज्ज व अद्ययावत कोव्हिड सेंटरची निर्मिती कर्जुले हर्या येथे करण्यात आलेली आहे. या सेंटर मधून आत्तापर्यंत सुमारे दीड हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.दिल्ली भेटीत या कामाची माहिती आमदार लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिल्यानंतर या कामावर खा.पवार खूश झाले व त्यांनी ॲम्बुलन्स देण्याची सूचना केली होती.
         पुण्याच्या कौन्सिल हॉल येथे संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत आमदार निलेश लंके यांच्याकडे ॲम्बुलन्सची चावी सुपूर्द करण्यात आली. 
         शुक्रवारी दुपारी या रुघ्णवाहिकेचे लोकार्पन कर्जुले हर्या येथील मा.शरदचंद्रजी पवार कोविड सेंटरमध्ये आमदार निलेश लंके यांनी मतदार संघातील राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष अशोकराव सावंत, बाबाजी तरटे,सुदाम पवार,बाळासाहेब खिलारी ॲड.राहुल झावरे,सुरेशशेठ धुरपते,राजेंद्र चौधरी, अंकुश पाय मोडे,विक्रम कळमकर, सुवर्णाताई धाडगे,विजय औटी, डॉ.कावरे,,कारभारी पोटघन,श्रीकांत चौरे, सचिन पठारे, संदीप चौधरी, संतोष ढवळे,नितीनशेठ चिकणे, प्रा.लाकूडझोडे सर,शंकरशेठ चिकणे,राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधीकारी, हितचिंतकांसह पारनेरच्या तहसीलदार सौ. ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने,आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे,डॉक्टर लोंढे डॉक्टर बर्वे यांच्या सह महसुल विभाग,आरोग्य विभाग व या सेवाकेंद्रात योगदान देणाऱ्या सहकारी मित्रांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले .