Breaking News

पारनेर तालुक्यात काल १२ अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या घटत आहे ही दिलासादायक बाब!

पारनेर तालुक्यात काल १२ अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या घटत आहे ही दिलासादायक बाब!


पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील काल दि.१७ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार १२ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पॉझिटिव्ह अहवालामध्ये पारनेर शहर ४ सुपा २ डिकसळ १ निघोज २ दैठणे गुंजाळ १ ढवळपुरी १  वनकुटे १ या गावातील व्यक्तींचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तालुक्यातील रुग्ण संख्या घटलेली आहे त्यामुळे तालुक्याला काही अंशी दिलासा मिळाला आहे नागरिकांनी कोरोना संदर्भात दाखवलेली जागरूकता व घेतलेल्या काळजीमुळे रुग्ण संख्या कमी झाली असण्याची शक्यता आहे सध्या सण व उत्सव असल्याने नागरिक बाहेर पडण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्या काळामध्ये नागरिकांनी कोरोना संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे तसेच लक्षणे दिसतात कोरोना चाचणी करून घेण्याचे प्रशासन वेळोवेळी अहवान करत आहे.