Breaking News

पारनेर तालुक्यात काल प्राप्त झालेले १९ अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यात काल प्राप्त झालेले १९ अहवाल पॉझिटिव्ह


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील काल दि. ७ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार १९ व्यक्तींना कोरोनाची ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्याही स्थिर झाली असल्यामुळे तालुक्याला काही अंशी दिलासा मिळाला आहे मात्र तरीही नागरिकांनी कोरोना संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे तसेच तालुक्यातील नागरिक कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर संशयित लोक चाचणी करण्यासाठी समोर येत नसल्याने ही संख्या मंदावली असल्याचे कारण समोर येत आहे.
पारनेर तालुक्यात झालेल्या पॉझिटिव अहवालानुसार सुपा २ जवळा १ शहाजापूर १ वाघेवाडी (ढवळपुरी) १ ढवळपुरी २ रुई छत्रपती २ पारनेर शहर २ वडझिरे १ टाकळीढोकेश्वर १ सावरगाव १ बुगेवाडी १ शिरापूर १ आळकुटी १ भोयरे गांगर्डा १ पळवे खुर्द १ या गावांचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.