Breaking News

मंत्रिमंडळात बदल नाही : पवार

- नाथाभाऊंची पक्ष संघटनेच वर्णी लागण्याची शक्यता


मुंबई : भाजप पक्षात तब्बल 40 वर्षे राजकीय नेतृत्त्व करणार्‍या एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्याने मंत्रिमंडळात बदल होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशामुळे मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, याबाबत ज्या माध्यमांनी बातम्या चालल्या त्या चुकीच्या असल्याचेही शरद पवार म्हणाले. अजित पवार हे नाराज असल्याची चर्चादेखील पवारांनी फेटाळून लावली.

---------------