Breaking News

कोपरगाव तहसील कार्यालयातील जेलर देशमुख पाचशे रुपयांची लाच घेताना अटकेत

कोपरगाव तहसील कार्यालयातील जेलर  देशमुख पाचशे रुपयांची लाच घेताना अटकेत 


कोपरगाव लोकमंथन वृत्तसेवा : तक्रारदाराची दारूबंदीची चाप्टर केस बंद करण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी करणाऱ्याकोपरगाव येथील तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक व जेलर रविंद्र नारायण देशमुख वय वर्ष ४८ तहसील कार्यालय कोपरगाव याला पाचशे रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडून अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी दिली. 
   
  या प्रकाराने महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे याआधी देखील कोपरगाव तालुक्यातील दोन तलाठ्याना लाच घेताना रंगेहात पकडले होते

याबाबतची अधिक माहिती अशी तक्रारदार पुरुष,वय-३५, रा.  पढेगाव  ता. कोपरगाव  आरोपी- रविंद्र नारायण देशमुख  वय. ४८ फौजदारी लिपिक  व जेलरतहसील कार्यालय कोपरगाव   वर्ग-3 यांनी पाचशे रुपये लाचेची मागणी- केली तक्रारदार  यांचेवर कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन ला दारूबंदी चा गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यात तक्रारदार यांचेवर तहसिलदार कार्यालयात चॅप्टर केस पाठवण्यात आली होती. सदर चॅप्टर केस बंद करण्यासाठी जेलर रविंद्र देशमुख  यांने तक्रार दार यांचेकडे ५००/- रु. ची लाचेची मागणी करुन ती दि. १२/१०/२०२० रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे पंच  साक्षीदारांची समक्ष  स्विकारली. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.                                    या पथकात उज्ज्वल पाटील पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथक  नाशिक  सह अधिकारी  पोलिस निरीक्षक मृदुला नाईक ला.प्र.वि नाशिक  सापळा पथक - पोहवा. कुशारे, पोहवा. गोसावी, पो ना महाजन , पोना. बाविस्कर,पोना. शिंपी  लाप्रवि नाशिक  यांचा समावेश आहे नाशिक लाच लुचपत  परिक्षेत्राचे  विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने  पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक निलेश सोनवणे , अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक  दिनकर पिंगळे पोलीस उप अधीक्षक वाचक नाशिक आरोपीचे सक्षम अधिकारी-  तहसिलदार योगेश  चंद्रे कोपरगाव यांचे समक्ष कारवाई करण्यात आली