Breaking News

पारनेर बाजार समितीत ८० रुपये कांद्याला भाव.

पारनेर बाजार समितीत ८० रुपये कांद्याला भाव.
------------
बाजार समितीत दहा गोण्या कांद्याला मिळाला ८० रुपये बाजारभाव.
------------
कांद्याची आवक कमी झाल्याने व देशांतर्गत मागणी वाढत असल्याने यापुढेही भाव वाढ होण्याची शक्यता.
------------
कांद्याला बाजार भावात वाढ ; मात्र काही शेतकऱ्यांमध्ये खुशी काहीमध्ये गम!


पारनेर प्रतिनिधी : 
पारनेर बाजार समितीमध्ये रविवार दि. १८ रोजी झालेल्या लिलावामध्ये ८० रुपयाचा कांद्याला बाजारभाव मिळाला मात्र हे वक्कल दहा गोण्यांचेच होते सरासरी प्रथम प्रतीच्या कांद्याला ६५ ते ७५ रुपये किलो प्रमाणे बाजार भाव मिळाला आहे.
या हंगामातील हा या बाजार समितीत उच्चांकी दर आहे यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नवीन कांदा पावसामुळे खराब झाल्याने बाजार भाव वाढले आहेत तसेच आवक कमी आहे ठराविक शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा शिल्लक आहे त्याला चांगला बाजारभाव मिळत आहेत मात्र नवीन कांद्याच्या लागवडी पावसामुळे पूर्ण खराब होण्याच्या अवस्थेत आहे.


दि. १८ रोजी बाजार समितीत ९७३५ गोण्यांची आवक झाली होती प्रथम प्रतीच्या कांद्याला ६५०० ते ७५०० द्वितीय प्रतीच्या कांद्याला ५५००ते ६४०० तिसऱ्या प्रतीच्या कांद्याला ४००० ते ५४०० चौथ्या २५०० ते ३९०० व पाचव्या १०००ते २४००असा क्विंटलला बाजारभाव मिळाला.सध्या कांद्याचा तुटवडा निर्यात बंद असली तरी देशांतर्गत जाणवत आहे त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत दक्षिणेकडील राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे देशांतर्गत कांद्याला मागणी वाढल्याने बाजार भावामध्ये वाढ होताना दिसत आहे महाराष्ट्रात नाशिक परिसरामध्ये जास्त प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते मात्र यावर्षी तेथील कांदाही पावसामुळे खराब झाला आहे राज्यातील इतरही भागातील कांद्याचे उत्पादन घटले आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे सध्या बाजारामध्ये जुना कांदा येत आहे या कांद्याला चांगला दर मिळत आहे काही शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा चाळी मध्ये साठवून ठेवला होता त्याने सध्या काजळी पकडली आहे  हवामानामुळे तो खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे मात्र त्यातील चांगल्या प्रतीच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील नवीन लागवड झालेला कांदा अनियमित हवामान व संततधार पावसामुळे खराब झाला आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये बाजारामध्ये कांदा उपलब्ध होणार नाही तसेच जो कांदा उपलब्ध होईल तो कमी प्रमाणात असणार आहे हवामान व पावसामुळे उत्पन्नात मोठी घट निर्माण झाली आहे. नवीन कांदा बाजारात कधी उपलब्ध होतो हेही अजून निश्चित नाही त्यामुळे येत्या काही दिवसात कांदा भाव खाणार आहे.

कांद्याचा बाजार भाव वाढत असला तरी शेतकऱ्यांमध्ये काही खुशी काही गम!
रविवारी झालेल्या लिलावामध्ये मध्ये दहा गोण्या कांद्याला ८० रुपये बाजारभाव मिळाला मात्र इतर पहिल्या प्रतीच्या कांद्याला ७५ रुपये बाजार भाव मिळाला आहे ठराविक शेतकऱ्याकडे कांदा उपलब्ध आहे व नव्याने कांद्याचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना हवामानाच्या लहरीपणामुळे संततधार पावसामुळे कांद्याला रोगराईला सामोरे जावे लागत आहे शेतकऱ्यांना सध्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे त्यातील बरेचसे कांदे खराब झाले आहेत त्यामुळे भाव वाढत असला तरी काही शेतकऱ्यांमध्ये खुशी तर काही मध्ये गम आहे.
 सध्या कांद्याची आवक कमी झाली आहे दरवर्षी या महिन्यामध्ये नवीन कांदा विक्रीसाठी येत असतो मात्र अनेक ठिकाणी अतिवृष्टी व पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे नवीन कांदा बाजार समितीमध्ये अद्याप विक्रीसाठी आलेला नाही त्यामुळे जुना कांदा बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे त्याला चांगला बाजारभाव मिळत आहे मात्र त्याची आवक कमी आहे व देशांतर्गत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ होत आहे.
------------
प्रशांत गायकवाड
 सभापती बाजार समिती पारनेर