Breaking News

पिंपरी जलसेन मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव ; प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची गरज !

पिंपरी जलसेन मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव ; प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची गरज !


पिंपरी जलसेन/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे पुन्हा कोरोणाचा शिरकाव झाला असून कोरोणाने पुन्हा डोके वर काढले आहे. प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
       पिंपरी जलसेन येथे गेल्या 3,4 दिवसांपासून प्रत्येकी 2, 6, 1 व्यक्तींचे कोरोना अहवाल सकारात्मक आले आहेत. रॅपिड टेस्ट अंतर्गत हे अहवाल सकारात्मक आले आहे. यापूर्वी तालुक्यातील पहिला कोरोनचा रुग्ण असणारा पिंपरी जलसेन येथील जावयाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याची चर्चा जिल्हाभर झाली होती. त्यानंतर  पिंपरी जलसेन येथे अनेक दिवस कोरोणाचे रुग्ण आढळले नव्हते.  कोरोनाने पुन्हा एकदा पिंपरी जलेसन येथे डोके वर काढले असून पिंपरी जलसेन करांसाठी हा चिंतेचा विषय आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.