Breaking News

दारु पिण्यास पैसे दिले नाही पत्नीला जीवे मारले

दारु पिण्यास पैसे दिले नाही पत्नीला जीवे मारले


देवळाली प्रवरा/प्रतिनिधी :
किरकोळ कारणावरुन पती- पत्नीचे भांडण जुंपले. पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लाकडी आयताकृती दांडा मारला. त्यात पत्नी जागीच ठार झाली. त्यानंतर तो फरार झाला होता.दहा तासानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 
             शितल बाबासाहेब गोलवड (वय ३५, रा. आंबी स्टोअर जवळ,  देवळाली प्रवरा) असे मृताचे तर  बाबासाहेब उर्फ पिंटू विठ्ठल गोलवड (वय ४०, रा. देवळाली प्रवरा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
                  पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, सहाय्यक निरीक्षक सचिन बागुल, परिविक्षाधीन उपनिरीक्षक नीरज बोकील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.