Breaking News

पारनेर तालुक्यांमध्ये काल ३४ अहवाल पॉझिटिव्ह.

पारनेर तालुक्यांमध्ये काल ३४ अहवाल पॉझिटिव्ह.
----------
संसर्ग वाढत असताना नागरिक बिंदास


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यांमध्ये काल दि.२ रोजी अहवालानुसार ३४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना चा संसर्ग वाढत आहे मात्र तालुक्यातील नागरिक अद्यापही बेफिकिरी ने वागत आहेत त्यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांच्यावर उपायोजना करण्यामध्ये अतिरिक्त ताण वाढत आहे.
काल प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालानुसार पिंपरी जलसेन ६ पारनेर शहर ५ भाळवणी ३ पानोली १ मावळेवाडी १ विरोली १ जाधववाडी १ वाडेगव्हाण १ नांदूर पठार १ गुणोरे १ कुरुंद १ म्हस्केवाडी १ कोहकडी २ वडझिरे ३ टाकळी ढोकेश्वर १ कार्जुले हर्या १ दैठणेगुंजाळ ४ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह समावेश आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे यामध्ये सुपा हंगा कान्हूर पठार निघोज या गावांचा समावेश आहे. तालुक्यात मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये नागरिक कोरोना बाबत निष्काळजीपणे वावरताना दिसतात त्याविरोधात पारनेर पोलिसांनी धडक मोहीम राबविली असून विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांवर दंड आकारण्यात येत आहे पारनेर नगरपंचायतीचे देखील शहरांमध्ये नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
दरम्यान कान्हूर पठार येथे काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे त्याच धर्तीवर सुरक्षितता व कोरोना व रुग्णांची वाढती साखळी तुटावी म्हणून येथील नागरिकांनी पाच दिवसांसाठी जनता कर्फ्यू चे पालन करणार असल्याची माहिती दिली आहे.