Breaking News

चर्मकार महासंघाकडून हाथरस घटनेचा निषेध

चर्मकार महासंघाकडून हाथरस घटनेचा निषेध
पाथर्डी/प्रतिनिधी :
उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील एका खेडेगावात  मनीषा वाल्मिकी नावाच्या मुलीवर काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार केला.या घटनेचा निषेध चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात आला.तसेच या घटनेचा दावा फास्ट ट्रॅक न्यायालयात दाखल करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी.या मागणीचे निवेदन पाथर्डीचे नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना देण्यात आले.    

        यावेळी पदाधिकारी रत्नमाला उदमले,सुभाष भागवत, आंबेरकर,रोहिदास एडके आदी मान्यवर उपस्थित होते.