Breaking News

वडनेर हवेली च्या विकासाचा अनेक वर्षाचा राहिलेला बॅकलॉग भरून काढणार : आमदार निलेश लंके

वडनेर हवेली च्या विकासाचा अनेक वर्षाचा राहिलेला बॅकलॉग भरून काढणार : आमदार निलेश लंके
-------------
भविष्यात वडनेर हवेलीच्या विकास कामांसाठी झुकते माप.
-------------
पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून वडनेर हवेलीने केलेल्या कामाचे आ.लंके यांच्याकडून कौतुक.


पारनेर प्रतिनिधी : 
वडनेरकरांनी माझ्यावर दाखवलेल्या प्रेमातून मला उतराई होण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे भविष्यात वडनेर हवेली गावाच्या विकासाला झुकते माप देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल वडनेर हवेली च्या विकासकामांचा राहिलेला अनेक वर्षाचा बॅकलॉग भरून काढणार असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
वडनेर हवेली तील रामवाडी येथील दशलक्ष रुपयाच्या सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे उद्घाटन प्रसंगी आमदार निलेश लंके बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल रेपाळे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड,पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अशोक सावंत,माजी प. स. सदस्य राजू चौधरी,प्रा.संजय लाकूडझोडे, चंद्रकांत मोडवे,पूनम ताई मुंगसे,तुषार सोनवळे, संदीप ठाणगे,अमोल मापारी अतुल शेटे,पंचायत समितीचे अभियंता धुरपत साहेब आदी उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना आमदार लंके म्हणाले वडनेर हवेली या गावा बाबत माझे वेगळे नाते आहे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतले आहे त्यामुळे या गावाबद्दल माझ्या मनामध्ये विशेष प्रेम आहे वेळोवेळी निवडणुकीत देखील या गावातून चांगली मदत होत असते त्यामुळे मला गावासाठी अजून काही देने गरजेचे होते ते मी कोरोना मुळे देऊ शकलो नसलो तरी भविष्यामध्ये निश्चित सर्व प्रश्न मार्गी लावले जातील पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून वडनेर हवेली या गावाने चांगले काम उभे केले आहे त्याचा परिणाम पाणीदार वडनेर हवेली या रुपाने पहावयास मिळत आहे त्या कामाचे आमदार निलेश लंके यांनी कौतुक केले व भविष्यात पाणी फाउंडेशन साठी मदत करण्याचेही जाहीर केले प्रास्ताविक व सूत्रसंचालन सतीश भालेकर यांनी केले. यावेळी भास्कर भालेकर,भाऊ हारदे,रामराव रेपाळे,आबा रेपाळे,रावसाहेब रेपाळे, राणुजी बढे,भाऊसाहेब भालेकर, सचिन बढे,नामदेव बढे, किरण जाधव, विनायक कर्डीले, उत्तम भालेकर, दीपक भालेकर, अंकुश बढे, अरुण बढे, बबन दरेकर, निलेश बढे, शरद भालेकर, शांताराम वाळुंज,वैभव वाळुंज,साहेबराव वाळुंज, सौरभ वाळुंज, अमोल वाळुंज, राहुल रेपाळे, मुकुंद भालेकर, विलास भालेकर, शिवाजी भालेकर, अनिल बढे, राहुल सोनुळे, बाळासाहेब सोनुळे,अविनाश पिंपरकर, पप्पू भालेकर, अक्षय भालेकर, प्रतीक दरेकर, उत्तम कर्डीले, अब्बास शेख, सचिन कर्डीले, सुमित वाळुंज, सुमित बढे, नामदेव भालेकर, सुभाष भालेकर, संदेश वाळुंज, अतुल वाळुंज, स्वप्नील वाळुंज, मिलिंद झिने, संदीप राऊत, रामभाऊ साळवे, स्वप्नाली भालेकर, जयश्री वाळुंज, अलका हरदे, शारदा दरेकर,माजी सरपंच चंदाबाई रेपाळे, शारदा बढे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.