Breaking News

करोनाची परिस्थिती निवळल्याशिवाय एकही महाविद्यालय सुरू होणार नाही : उदय सामंत

Uploading: 672623 of 672623 bytes uploaded.

Mumbai : राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या दृष्टीने राज्य सरकार अनेक पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मागील सात महिन्यांपासून महाविद्यालय बंद असून, जोपर्यंत करोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही. तोपर्यंत राज्यातील एकही महाविद्यालय सुरू होणार नाही. अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ येथे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत त्यांनी संवाद साधला.