Breaking News

कत्तलीसाठी गाईची वाहतूक करणारे दोन टेम्पो पकडले !

कत्तलीसाठी गाईची वाहतूक करणारे दोन टेम्पो पकडले !

कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई !

कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोपरगाव शहरातील येवला नाका या ठिकाणी अज्ञात गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या खबरी नुसार कोपरगाव शहर पोलिसानी टाकलेल्या धाडीत दोन पिकअप क्र. एम एच १५ ईजी ००२४ व क्र. एम एच २० डीई ६५०४ मधील  सहा जर्सी गायी 
अंदाजे ०३ लाख ६७ हजार रुपये किमतीची जनावरे अवैध रित्या वाहतूक करताना आढळल्याने पोलिसानी दोन वाहनासह तीन आरोपी दीपक शिवाजी निंबाळकर (वय-२५), रा.करंजी ता.निफाड,साजिद ईसा कुरेशी (वय-२८) रा.कागजीपुरा खुलताबाद,अकिब सत्तार कुरेशी (वय-१९) रा.आयेशा कॉलनी,कोपरगाव आदी तीन आरोपीना अटक केली.
कोपरगाव शहरात सध्या  गायी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.त्यातच २ आॕक्टोबर रोजी सकाळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत  बातमी मिळाली असता त्यांनी गस्तीवर असलेल्या आपल्या पोलीस पथकाला तातडीने  येवला नाका या ठिकाणी पाठवले असताना मिळलेली खबर पक्की असल्याची खात्री झाली.त्या ठिकाणी दोन महिंद्रा पिकअप गाड्या उभ्या स्थितीत आढळल्या  त्यात गोवंश जातीची साधारण तीन लाख ६७ हजार रुपये किमतीची जनावरे त्यात सहा मोठ्या गायी,मिळून आल्या घटनास्थळी पो.हे.कॉ.आर.पी.पुंड यांनी पशु वैद्यकीय अधिकारी श्रद्धा महादेव काटे यांना बोलावून घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली व सदरची जनावरे हि खाजगी वाहनात भरून ती कोकमठाण या ठिकाणच्या गोशाळेत रवानगी केली आहे  आरोपी दिपक शिवाजी निंबाऴकर  साजीद इसा कुरेशी , अकिब सत्तार कुरेशी यांनी स्व:ताचे फायद्यासाठी गोवंश भाकड जनावरे यांना क्रुरपने वागणुक देवुन कत्तलीच्या उद्देशाने स्व:ताजवऴ जख्मी अवस्थेत बेकायदेशीर जवळ बाळगताना मिऴुन आला म्हणुन त्याचे विरुध्द पोका. २५११ सुरजकुमार जिवन अग्रवाल (३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवी ४२९ भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागवण्याचा अधि.१९६० चे कलम ११(१)(ह) व महा.प्रणी संर.का.व सुधारणा अधि.क.१९९५ चे कलम ५(ब) ९ प्रमाणे गुन्हा रजी. दाखल करण्यात आला आहे