Breaking News

ट्रॅक्टरमधून विनापरवाना वाळूची वाहतूक करत असताना पोलिसांची कारवाई मुद्देमाल जप्त गुन्हा दाखल.

ट्रॅक्टरमधून विनापरवाना वाळूची वाहतूक करत असताना पोलिसांची कारवाई मुद्देमाल जप्त गुन्हा दाखल.


पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील खडकवाडी घाट येथे वाळूची विनापरवाना चोरून ट्रॅक्टरने वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पारनेर पोलिसांना आढळून आला त्यानंतर हा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला असून तीन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२४ रोजी आरोपी विठ्ठल गबाजी जाधव वय ३५ वर्षे धंदा शेती राहणार मांडवे खुर्द तालुका पारनेर हा त्याच्या स्वतःच्या मालकीच्या महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ५७५ मॉडेलचा ट्रॅक्टर व दोन चाकी डम्पिंग ट्रॉली किंमत अंदाजे ३००००० मधून विनापरवाना १ ब्रास वाळू ट्रॉली मध्ये भरलेली किंमत ४००० रु वाळूची चोरी  करून वाहतूक करत असताना खडकवाडी घाट उतरत असताना समोरून मांडवे गावाकडून टाकळी बाजूकडे रोडवर पोलिसांना आढळला त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर व वाळू ताब्यात घेतली याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती पाराजी साळवे यांनी दिली असून त्यानुसार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल कडूस करत आहेत.