Breaking News

सैनिक बँकेची कर्जदार पुरुषोत्तम शहाणे यांनी केली होती फसवणूक.

सैनिक बँकेची कर्जदार पुरुषोत्तम शहाणे यांनी केली होती फसवणूक.
----------
कर्जदाराने बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर बनावट पावत्या करून कर्ज भरले असल्याचे भासवले.
---------
पुरुषोत्तम शहाण्यांनी बँकेला धडा शिकवायचा या उद्देशाने प्रकरणाला दिली उचल.
---------
सैनिक बँक फसवणूक प्रकाराला वेगळे वळण.


पारनेर प्रतिनिधी :
 पारनेर तालुक्यातील सैनिक बँक मध्ये नुकताच पुरुषोत्तम शेहाणे यांनी सैनिक बँकेच्या चेरमान व्यवस्थापक व इतर   यांनी मिळून फसवणूक केल्या बाबतची फिर्याद पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दिली त्यावरून या प्रकरणाची सध्या तालुक्यात चर्चा आहे मात्र पुरुषोत्तम शहाणे यांनी सन २००१ बँकेतून कर्ज घेतले मात्र हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली तसेच बँकेचे बनावट सही शिक्के बनवून बँकेत पैसे भरल्याचा खोटे स्लिपा तयार केले याप्रकरणी त्यावेळेस बँकेने त्यांच्या विरोधात दावा दाखल केला होता तडजोडी अंती प्रकरणावर त्यावेळी पडदा पडला मात्र शहाणे यांनी बँकेच्या धडा शिकवायलाच या उद्देशाने या प्रकरणाला उचल देत वेळोवेळी बँकेची बदनामी केली असे बँकेच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे बँकेची झालेली बदनामी यामुळे बँक व्यवस्थापन शहाणे विरोधात पुन्हा दावा दाखल करणार आहे याबाबतचे सर्व कागदपत्रे बँक व्यवस्थापनाकडे आहेत.
याबाबत खटला दिवाणी न्यायालय मध्ये २००५ झाली सुरू होता यामध्ये पुरुषोत्तम शहाणे यांनी त्यांच्या व्यवसाय करतात २००१ रोजी सैनिक बँकेकडून सहा लाख रुपये कर्ज घेतले होते व त्याप्रमाणे त्यांनी कागदपत्रांची व जामीनदार यांची पूर्तता केली होती मात्र शहाणे यांनी करारानुसार बँकेने दिलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यामुळे त्यांना बँकेने वेळोवेळी नोटिसा पाठवल्या होत्या नोटीस देऊनही त्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाही तसेच जंगल मालमत्ता जप्त करू नये असा मनाई हुकूम त्यांनी बँकेत विरोधात घेतला सहाय्यक निबंधक यांच्याकडे सहकार कायदा कलम १०१ अन्वय वसुली चा दाखला मिळण्यासाठी प्रकरण दाखल केले त्या प्रकरणात शहाणे यांनी हजर होऊन २८ फेब्रुवारी २००५ रोजी त्यात काही कागदपत्र दाखल केली व त्याने घेतलेल्या कर्जाचे रकमेपैकी ४७८७६० रुपये संस्थेत भरणा केल्याबाबत कथन केले व त्या कामी काही पावत्या दाखल केल्या मात्र या दाखल केलेल्या पावत्यांची पडताळणी केली असता त्या पावत्या बोगस असल्याचे व त्यावरील शिक्के व सह्या बोगस असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर बँकेने पुन्हा शहाणे यांना व्याजासकट रक्कम भरावी रक्कम न भरल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची समज दिली मात्र शहाणे यांनी पुन्हा उत्तर देऊन सर्व आरोप फेटाळून लावले अशा रीतीने शहाणे यांनी हेतुपुरस्पर खोटे कागदपत्र तयार करून बँकेची फसवणूक केली.
याप्रकरणी पुरुषोत्तम शहाणे यांच्या विरोधात त्यावेळी कर्ज म्हणून घेतलेली मूळ रक्कम व त्याचे व्याज बँकेत परत भरणा न करता हेतूपुरस्पर खोटे कागदपत्र तसेच बँकेत पैसे भरले आहेत अशा खोट्या पावत्या तयार करून बँकेचे खोटे शिक्के सह्या मारून वेळोवेळी बँकेत पैसे भरले आहे असे भासवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुढे हे प्रकरण दिवाणी न्यायालय मध्ये चालले होते त्यावेळी आरोपी पुरूषोत्तम शहाणे यांनी बँकेशी तडजोड केली व आपण रक्कम भरण्यास तयार आहोत आपल्या विरोधातील गुन्हे मागे घ्यावे अशी विनंती केल्यानंतर आपसात तडजोड झाली व फिर्यादी व आरोपी यांच्याविरोधात कुठलीही तक्रार नाही म्हणून हे प्रकरण निकाली काढले गेले होते. मात्र त्यानंतर पुरुषोत्तम शहाणे यांनी सैनिक बँकेच्या पदाधिकारी व व्यवस्थापनात विरोधात वेळोवेळी तक्रारी दाखल करत व इतर बाबींचा उपोषण व अन्य मार्गाने बँकेची अनेक वेळा बदनामी केली आहे याबाबत बँक व्यवस्थापन व पदाधिकारी यांनी माहिती दिली आहे तसेच मागील कागदपत्रांच्या आधारे शहाणे यांच्यावर बँक दावा दाखल करणार आहे अशी माहिती व्यवस्थापनाने दिली आहे.

 नुकतेच पुरुषोत्तम शहाणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये बँकेच्या आजी-माजी पदाधिकारी व्यवस्थापन व इतर काही व्यक्तींविरोधात फिर्याद दिली होती त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र पुरुषोत्तम शेहाणे यांच्यावर बँकेने २००५ रोजी बनावट कागदपत्र व सह्या शिक्का तयार करून बँकेत पैसे भरण्याच्या पावत्या बनवल्या व त्याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र हे प्रकरण दिवाणी न्यायालयात आल्यानंतर पुरुषोत्तम शहाणे यांनी आपण बँकेचे राहिलेले कर्ज भरण्यास तयार आहोत आपल्या विरोधात सर्व दावे मागे घ्यावी अशी विनंती केली व प्रकरण आपसात तडजोडी अंती मिटले होते मात्र शहाणे यांनी बँकेच्या अधिकारी पदाधिकारी यांच्या विरोधात दाखल केलेल्या फिर्यादी मुळे हे प्रकरण पुन्हा नव्याने समोर आले आहे यामध्ये शहाणे यांनी देखील बँकेची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.