Breaking News

पारनेर तालुक्यातील काल १० अहवाल पॉजिटीव्ह. रूग्ण संख्येत घट तालुक्यातील नागरिकांना दिलासा

पारनेर तालुक्यातील काल १० अहवाल पॉजिटीव्ह. रूग्ण संख्येत घट तालुक्यातील नागरिकांना दिलासा


पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोना चाचणीच्या अहवालानुसार काल दि. ११ रोजी १० अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या ही गेल्या तीन दिवसांपासून कमी होताना दिसत. 
या पॉझिटिव्ह अहवालामध्ये सुपा २ निघोज २ कान्हूर पठार १ वडझिरे १ पुणेवाडी १ वाघुंडे बुद्रुक १ आळकुटी १ हंगे १ या गावाचा पॉझिटिव अहवालात समावेश आहे.
तालुक्यांत गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी होताना दिसत आहे त्यामुळे ही तालुक्यासाठी दिलासादायक बाब आहे मात्र अजूनही कोरोना चा धोका कायम असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाचे नियम पाळून काळजी घ्यावी.
दि.१० रोजी तालुक्यात सात अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे यामुळे आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण काही प्रमाणात कमी झाला आहे मात्र नागरिकांनी रुग्ण संख्या कमी झाली म्हणून नियमाचे पालन केले नाही व सार्वजनिक ठिकाणी गर्दी केली तर संख्या वाढू शकते त्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना सर्वतोपरी खबरदारी घेतली पाहिजे.