मुंबई | शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 24 सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण...
मुंबई | शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 24 सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
आज रूग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एकनाथ शिंदे आपल्या मुलासोबत घरी गेले. घरी जाण्याअगोदर खासदार श्रीकांत शिंदे, पोलीस आयुक्त विवेक फडणसाळकर या शिवाय इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी होम केला होता. कोरोनावर मात केल्यावर शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.