Breaking News

भांडगाव येथे पती-पत्नीला दोघांनी कोयत्याने केली मारहाण

भांडगाव येथे पती-पत्नीला दोघांनी कोयत्याने केली मारहाण


पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील भांडगाव येथे वडिलांना दमदाटी करतो का असे म्हणून दोघांनी पती व पत्नी ला कोयत्याने  वार करून गंभीर जखमी केले तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत फिर्याद प्रकाश माधव खरमाळे वय 63 वर्ष धंदा शेती राहणार भांडगाव तालुका पारनेर यांनी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देविदास नागुजी खरमाळे राहणार भांडगाव तालुका पारनेर यांचे घरासमोर दि. १० रोजी दुपारी ३ च्या सुमारास आरोपी सिद्धेश संदीप खरमाळे जयश संदीप खरमाळे दोघे राहणार भांडगाव तालुका पारनेर यांनी  तू आमच्या वडिलांना दमदाटी करतो काय असे म्हणून आरोपीनी प्रकाश माधव खरमाळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आरोपीने हातातील कोयत्याने त्याच्या डावे पायाचे मांडीवर मारले ते कोयता धरण्यास प्रयत्न केला असता त्यांना उजव्या हाताचे अंगठ्याला दुखापत झाली आहे  तसेच फिर्यादीची पत्नी ताराबाई ही मध्ये सोडण्यात आली असता आरोपीने तिचे उजवे हाताचे तळहातावर कोयत्याने मारून दुखापत केली व तुम्ही पुन्हा मळ्यात आले तर तुमच्या काटा काढू अशी धमकी दिली याबाबत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये दोन्ही पती पत्नी जखमी झाले आहेत त्यांच्यावर पारनेर ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जी. एस पंधरकर करत आहेत.