Breaking News

पारनेर येथे काल रात्री पुन्हा आढळला बिबट्या

पारनेर येथे काल रात्री पुन्हा आढळला बिबट्या.
----------
गणेश मंगल कार्यालय व ठोंबरे मळा परिसरामध्ये बिबट्या आढळल्याने परिसरामध्ये घबराट.
----------
वडनेर हवेली येथील तरुणांना बिबट्या चे दर्शन बिबट्याला पाहून तरुणांनी ठोकली धूम.
-------
अनेक दिवसापासून बिबट्या या परिसरामध्ये असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पिंजरा लावण्याची मागणी.


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर येथे गणेश मंगल कार्यालयाच्या जवळ असलेल्या टेकडी कडून बिबट्या वरखेड मळ्यात परिसराकडे जाताना राळेगण-सिद्धी चे माजी सरपंच जयसिंग मापारी व दत्ता आवारी यांच्या गाडीला आडवा झाला त्यांच्या गाडी समोरून बिबट्या वरखेड मळा या भागात प्रसार झाला असल्याचे दत्ता आवारी यांनी सांगितले  या परिसरामध्ये बिबट्या आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर परिसरात नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली
 पारनेर शहरातील गणेश मंगल कार्यालय येथे राळेगण-सिद्धी कडे जात असताना संध्याकाळी ७ च्या सुमारास माजी सरपंच जयसिंग मापारी व दत्ता आवारी यांच्या गाडीला बिबट्या आडवा गेला तो सरळ वरखेड मळा परिसराकडे जाताना त्यांनी पाहिला तसेच गणेश मंगल कार्यालय समोर असणाऱ्या टेकडी जवळ संध्याकाळी आठच्या सुमारास धावण्यासाठी गेलेल्या तरुणांना देखील बिबट्या दिसला होता .पारनेर येथे गेल्या तीन दिवसापूर्वी बिबट्याने संगमेश्वर मंदिर परिसराच्या जवळ एका तरुणाला दर्शन दिले होते त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील येथे येऊन पाहणी केली मात्र बिबट्या झाडीचा आश्रय घेत पसार झाला.
पानोली घाटात देखील काही दिवसापूर्वी बिबट्या काही लोकांनी पाहिला होता तसेच या परिसरामध्ये मेंढपाळांचा मेंढ्यांचा कळप आहे येथे देखील काही मेंढपाळांनीं बिबट्याला पाहिले होते या परिसरामध्ये अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याचे नागरिक सांगत आहेत मात्र या बिबट्याने जनावरावर किंवा इतर कोणावर हल्ला केलेला नाही.वरखेड मळा परिसर व गणेश मंगल कार्यालय परिसरामध्ये बिबट्या आढळला असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते अनेक सोशल मीडिया ग्रुप वर बिबट्या बाबत उलट-सुलट प्रतिक्रिया येत होत्या तर काही ग्रुप वर पटेरी वाघाचा व्हिडिओ काही लोकांनी शेअर केला होता मात्र त्याचा या बिबट्यांशी कोणताही संबंध नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान दि.२८ राजी रात्री ३.४५ वा शेतात पाणी देण्यासाठी जात असताना वडनेर हवेली येथे भालेकर मळा येथे गणेश भालेकर विक्रम भालेकर यांनी बिबट्या पाहिला बिबट्या घासाच्या शेतात लोळत होता त्यानंतर या तरुणांनी बिबट्याला पाहतच थेट घरी धूम ठोकली व परिसरातील नागरिकांना याबाबत सतर्क केले.
 पारनेर आणि वडनेर हवेली परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे मात्र त्यासोबत पिल्ले देखील असण्याची शक्यता असल्यामुळे पिंजरा लावण्याबाबत अडचण येत आहे मात्र त्याबाबत उपाययोजना केली जाईल तसेच परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे याबाबत आम्ही त्याठिकाणी जाऊन त्यांना माहिती दिली आहे जागृती केली तसेच रात्री-अपरात्री घराबाहेर पडू नये 
--------------
अश्विनी साळुंके
वनरक्षक पारनेर