Breaking News

रिया चक्रवर्तीचा कोठडीतील मुक्काम वाढला

 - तिसर्‍यांदा जामीनअर्ज फेटाळला

मुंबई/ प्रतिनिधी

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा जामीनअर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने तिसर्‍यांदा फेटाळला असून, तिच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रियाच्या कोठडीतील मुक्कामात वाढ झाली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, अब्दूल बासित परिहार, दीपेश सावंत, जैद विलंतरा आणि सॅम्युअल मिरांडा यांना मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेसत्र न्यायालयात हजर केले होते. या सर्वांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली असता, रियासह या सर्वांच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, रिया आणि तिचा भाऊ शौविकने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 30 सप्टेंबर रोजी या दोघांच्या जामीनअर्जावर सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल यांनी त्यावरील निर्णय राखून ठेवला होता.